-
Bhadramukhi (भद्रमुखी)
भद्रमुखि नामक बेटावर विज्ञाननं भाकित केलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचं निरिक्षण करण्यासाठी वैज्ञानिकांची एक तुकड़ी येते. या बेटावर एका मानवी समूहाचंही वास्तव्य आहे. या समुहाच्या आदिम संस्कृतीचं, परंपरारिवाजांचं, जीवनसंघर्षाचं नाट्यमय आणि उत्कंठावर्धक दर्शन घडवणारी ही विज्ञान-कादंबरी. भविष्याचा वेध घेत प्रत्यक्ष घडू पहाणार्या एका वैज्ञानिक सत्याचारी बरोबरीन अन्वयार्थ लावणारी. एका मानवी समुहाची विजीगीषा आणि विज्ञानाच्या प्रगतिशील पावलांवरही विजय मिळवू पाहणारी निसर्गाची अदम्य शक्ति यांची परस्परसंवादी समांतरता, हे या कादंबरीचं सूत्र. विज्ञानकथा -कादंबर्या लिहिणार्या मोजक्या लेखाकांताही कसदार नि समर्थ विज्ञानकथा-लेखक म्हणून अरुण हेबळेकररांचं नाव वरच्या श्रेणीत येतं. विज्ञानाकरता विज्ञान हां अट्टाहास न बाळगता,विज्ञानाला एखाद्या व्यक्ति-रखेइतकी स्वाभाविक, जिवंत भूमिका ललित साहित्यात देणं, हे अरुण हेबळेकरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य.फॅटसीची धूसरता आणि विज्ञानाची सत्यता यांची अदभुत रम्य गुंफण आणि व्यक्तिरेखांचं सूक्ष्म, मार्मिक आकलन लक्षणीय विज्ञान-कादंबरी या अर्थानं 'भद्रमुखि' निश्चितच नावाजली जाईल!
-
Ringanabaherun (रिंगणाबाहेरून)
पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून एखादे क्षेत्र निवडून त्यात यशस्वी झालेल्यांपैकी रामदास भटकळ एक आहेत. ग्रंथव्यवसायात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. रिंगणात काम करतानाच त्यांनी राजकारण, रंगभूमी, संगीत या क्[...]
-
Bhumi (भूमी)
माणसांचा स्वभाव, त्यांचे एकमेकांशी संबंध याला काही प्रमाणात परिस्थिती कारणीभूत ठरते. म्हणूनच कधी कधी रोज भेटणारी, जवळची माणसे यांच्याशी नाळ जुळत नाही, पण दूरच्यांशी स्नेह जुळतो. अशा मानवी स्वभावाचे कंगोरे 'आशा वगे' यांच्या 'भूमी' या कादंबरीतून दिसतात. २००४च्या 'सुनामी'मध्ये सापडलेल्या तामिळनाडूतील 'कडलूर' ह्या गावातील एका मुलीची ही कहाणी. आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून स्वतःचा शोध घेणा-या मैथिलीची ही कहाणी एक वेगळ अनुभव देते.
-
Karulcha Mulga (करुळचा मुलगा)
'करूळचा मुलगा' ही दारिद्य्राशी झगडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आशावादी वृत्तीने केवळ लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने स्वत:चे जीवन यशस्वी करणाऱ्या लेखकाने सांगितलेली जीवनकथा आहे. एका अर्थाने हे मधु मंग[...]
-
Mich Majha Mor (मीच माझा मोर)
प्रशांत असनारे यांच्या कवितांचा हा संग्रह. नातीगोती, दैनंदिन आयुष्य.. त्यातील विसंगती अत्यंत सफाईने टिपणाऱ्या या कविता हृदयाचा ठाव घेतात. काही वेळा भेदक भाष्य करून जातात. जळजळीत वास्तवाचा वेध घेऊन अस्वस्थही करतात. असनारे यांच्या कवितेत वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद आहे.
-
Karya Aani Karyakarte (कार्य आणि कार्यकर्ते)
समाजकार्य करणे ही फॅशन झाली आहे; पण आजही तळमळीचे कार्यकर्ते सामासाठी काम करीत आहेत. वंचितांसाठी लढत आहेत. अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे काम, त्यांचे अनुभव 'कार्य आणि कार्यकर्ते' मधून वाचायला मिळतात. मरा[...]