-
Band Khidkibaher (बंद खिडकीबाहेर)
सुलभा ब्रह्मनाळकर यांचा ललित लेखांचा हा संग्रह. हे ललित लेख म्हणजे प्रवासवर्णने आहेत. मौज आणि पद्मगंधा दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे. भारत आणि परदेशांतील अनेक ठिकाणे त्यांनी बघितली.त्या सार्यांचे त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने वर्णन केले आहे.आपल्या प्रवासात त्यांनी काही लेखकांच्या शहरालाही भेट दिली. त्यांच्या लेखनात केवळ स्थळांची वर्णने नाहीत, तर तिथली संस्कृती, लोकजीवन, आदीचा तपशील येतो. तसेच नृत्यकला आणि शिल्पकला याचीही माहिती येते. संगीत, चित्रकला या विषयांची माहिती देत त्या प्रवासाचे वर्णन करतात, त्यामुळे केवळ प्रवासवर्णनपर लेख, इतकेच स्वरूप या लेखांना राहत नाही. लेखिकेने लेखनाचा वेगळा प्रयोग केला असून, तो वाचनीयही झाला आहे.
-
Chakrivadal (चक्रीवादळ )
मानवाने कितीही प्रगती केली, तरी निसर्गापुढे तो खुजा आहे. दुष्काळ, भूकंप, वादळ अशा प्रसंगी ते प्रकर्षाने जाणवते. निसर्गाचे रौद्र रूप मानवाला होत्याचा नव्हते करते. याचा अनुभव नोव्हेंबर १९७७ मध्ये आंध्र प्रदेशच्या सागरी किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि एकच हाहाकार उडाला. वादळाबरोबरच मुसळधार पाऊस, सागराच्या लाटांनी उद्ध्वस्त केलेली जमीन, तीस हजार माणसांच्या मृत्यूचे तांडव देशाने पाहिले. त्याचे चित्रण प्रभाकर पेंढारकर यांनी ‘चक्रीवादळ’ या कादंबरीत केले आहे. सत्य घटना, प्रसंग, यामुळे निसर्गाने निर्माण केलेले एक भयाण वास्तव पुढे येते.