-
Donald Trump (डोनाल्ड ट्रम्प)
डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा ५४ वा राष्ट्रपती व्हावा यासारखी धक्कादायक घटना या शतकात अपवादानंच घडली असेल, अत्यंत अनपेक्षितरीत्या भल्याभल्यांचे अंदाज धुळीला मिळवून ट्रम्पनं हिलरी क्लिंटनचा पराभव करत जगातल्या सगळ्यात शक्तिशाली पदावर कब्जा केला. ट्रम्पला 'विदूषक' म्हणून हसण्यावारी नेणारे असंख्य लोक अक्षरशः अवाक झाले. कोण आहे हा डोनाल्ड ट्रम्प? तो इतका वादग्रस्त का आहे? सातत्यानं त्याच्याविषयी माध्यमामध्ये चित्रविचित्र बातम्या का छापून येतात? राष्ट्रपती झाल्यावरही त्याच्या वागण्याबोलण्यात पोक्तपणा, आपल्यावरच्या जबाबदारीची जाण यातलं काहीच का आढळत नाही? मुळात तो राष्ट्रपती झालाच कसा? राजकारणाचा गंधही नसताना आणि अत्यंत निषेधार्ह पार्शवभूमी लाभूनही तो इथंवर पोहोचलाच कसा? अमेरिकेला आणि त्यामुळे जगालाही पडलेल्या या महाभयानक स्वप्नाची हि खिळवून ठेवणारी|
-
Atmarangin Ruskin Bond (आत्मरंगी रस्किन बॉन्ड)
रस्किन बाँड... गेली साठ वर्षं सर्व वयोगटांतल्या, शहरांतल्या, लहान गावांतल्या वाचकांना ते रिझवत आहेत, त्यांच्यासाठी ते जणू जवळचे सोबतीच बनले आहेत. त्यांच्या कथांनी, पुस्तकांनी आपलं मनोरंजन झालं, कधी आपल्याला भुरळ घातली, तर कधी घाबरवलंही. त्यांच्या लिखाणानं वाचकांची सौंदर्यदृष्टी विकसित झाली आणि रोजच्या आयुष्यातलं, निसर्गातलं सौंदर्य टिपण्याची वाचकांची अभिरुची खुलली. निराश वाचकांच्या चेहर्यांवर त्यांनी हास्य फुलवलं आणि संकटांच्या अंधारात त्यांनी वाचकांना सावरलं. आत्मरंगी (मूळ पुस्तक - लोन फॉक्स डान्सिंग) हे रस्किन बाँड यांचं प्रांजळ आत्मकथन! या कथनात त्यांच्या कथांची, लेखनाची बीजं गवसतात.
-
Zunj Niyatishi (झुंज नियतीशी)
१७व्या शतकात भारतीय उपखंडात जणू अंधकारांचं साम्राज्य होंत.. क्रूर लढाया, अमानुष अत्याचार आणि धर्माच्या नावाखाली होणार संस्कृतीचा आणि अध्यात्माचा ऱ्हास यामुळे स्वाभिमान लयाला गेला होता, पण छत्रपती शिवाजी ह्या दृष्टाच्या लढवय्यांन हाच हरवलेला स्वाभिमान नव्यानं संपादित केला. आर्थिक समतेची आणि दुर्बलांच्या सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवली, नियतीनं छत्रपती शिवाजीची सत्वपरीक्षा पदोपदी घेतली. एकीकडे पराभूत झालेला, खचलेला बहुजन समाज; तर दुसरीकडे मुघलांचं शक्तिशाली साम्राज्य आणि त्यात पाश्चात्य शक्तींनी नौदलावर मिळवलेले सर्वाधिक अशा सर्व अंगांनी शिवाजी महाराजांपुढे आव्हानं आ वासून उभी होती, मग युगानुयुगे सर्वांत प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात परस्पर विरोधी विचारधारांचा, श्रद्धांचा आणि विभिन्न दृष्टिकोणाचा जणू संघर्षच पेटला. चला तर मग, या संघर्षमय गडद अंधारात लख्ख चकाकणाऱ्यां त्या विद्युल्लतेचा अनुभव घेऊ. आजही ती भारतीय उपखंडाला प्रकाशमान करत आहे.. तिचे प्रतिध्वनी इथल्या कानाकोपऱ्यांत आजही निनादताहेत!
-
Vachanpurti ( वचनपूर्ती )
लक्षावधी स्त्री-पुरुषांना स्वप्नाचा पाठपुरावा करयाला उद्युक्त करणाऱ्या 'अँमवे' बदल्यचा अवघड प्रश्नांना हि आहेत थेट उत्तर! 'प्रॉमिसेस टु कीप' हि 'अँमवे' नावाच्या सत्यकथा आहे. जे व्हॅन अॅन्डेल आणि रिच डिव्होस या दोघा आदर्शवादी उद्योगजकानी केलेल्या आरंभापासून ते आज लाखो स्वतंत्र वितरक असलेली, थेट विक्री क्षेत्रात एक साम्राज्य उभं केलेली, कोट्यावधी रुपयाचा उलाढाली करणारी बहुराष्टीय कंपनी बनलेल्या कंपनीची हि कहाणी. गेल्या दोन वर्षात सीबीएसवर '६० मिनीटेस' या कार्यक्रमात हजेरी लावून 'डोनाह्यु' मधे अध्यासानी पर्दापण करून राष्टीय स्तरावर माध्यामध्ये 'अँमवे' नं एकदम धडक मारली. चार्ल्स पॉल कॉन अनेक लोकप्रिय गैरसमजुतिना विराम देतात. मथळामागचा बातमी बनवलेल्या माणसाचा वर्णन करून, अवघड प्रश्नाची सरळ उत्तर देतात आणि 'अँमवे' च्या नाटकातील अनेक पात्राची झलकही दाखवतात.
-
Tumhi Jithe aahat Titun Tumhala Jithe Jayache Aahe
तुमचे जीवन चाकोरीबद्ध बनले आहे का? अधिक चांगल्या जीवनासाठी स्वतः बदलण्याची वेळ आली आहे का? 'चिकन सूप फॉर द सोल' मालिकेचे सहनिर्माते जॅक कॅनफिल्ड यांनी त्यांच्या ८ कोटी डॉलसेच्या व्यवसायाची सुरुवात शून्यातून केली. या पुस्तकातून सांगितलेल्या २५ मुलभूत तत्वांना ते आपल्या यशाचे श्रेय देतात. या तत्वाचे पालन करून जीवनात तुम्हाला हवे असलेले सर्वकाही तुम्हाला मिळवू शकतात. कॅनफिल्ड विचारधारा अतिशय स्पष्ट,सोपी आणि अत्यंत प्रभावी आहे. या तत्वाचा सहाय्याने तुम्ही व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक आणि कौटूबिंक असा सगळ्या क्षेत्रात संपूर्णपणे बदल घडवून आणू शकतात.
-
Networkingchi Mulashare (नेटवर्किंगची मुळाक्षरे )
आयुष्यात केलेल्या लहान-सहान गोष्टीने नेटवर्किंग मध्ये बऱ्याच फरक पडतो. A-अटीट्युड(वृत्ती),B-ब्रंड व C-क्रीएटीव्हिटी(सर्जनशीलता) हि तर नुसती सुरुवात आहे, तुम्ही नवखे असाल किंवा अनुभवी नेटवर्किंग करणार असाल, तरी या पुस्तकामुळे तुम्ही आपल्या ग्राहकाशी, संभाव्य ग्राहकाशी व उद्योगाशी सबंधित इतर लोकाशी कसे वागता येईल , याचे चिंतन तुम्हाला करता येईल. या पुस्तकात तुम्ही खालील गोष्टी शिकाल: * नेटवर्क तयार करण्यासाठी दृढ संकल्पाची व लक्ष क्रेन्दित करण्याची आवश्यकता आहे. * सर्जनशीलतेचे महत्व आहे. * लोकांचा पाठपुरवा करणे इतके म्हत्वाचे आहे, कि तुमचा दैनंदिन दिनचर्येसाठी तुम्ही त्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. नेटवर्किंगची मुळाक्षरे हे पुस्तक कॉफी शॉप किवा विमानात बसून सुद्धा वाचण्यासारखे आहे. हे पुस्तक तुमचा सहकार्याला व व्यावसायिक मित्राला द्या आणि त्याचे व्यावसायिक सबंध वाढवायला उद्युक्त करा. तर तुम्ही कशाची वाट बघता.....
-
Karyalayin Dehaboli (कार्यालयीन देहबोली)
व्यवहार आणि मुलाखतीत यश मिळवा उत्कृष्ट सादरीकरण करा आंतरराष्ट्रीय देहबोली समजून घ्या आणि तिचा उपयोग करा नजरेला नजर देण्याचा अर्थ जाणून घ्या स्त्री-पुरुषांच्या भिन्न देहाबोलींमुळे होणारा संभ्रम टाळा कार्यालयातील कार्यक्रम आयोजित करण्यापासून कार्यालयातील फर्निचरच्या सर्वोत्कृष्ट राच्नेपर्यंत , तुम्हाला आणणारी देहबोली ओळखायला आणि सुधरायला 'कार्यालयीन देहबोली' तुम्हाला मदत करेल.
-
Rich Dadche The Business School (रिच डॅडचे द बिझन
ज्यांना इतरांना मदत करायला आवडतं अशांसाठी! या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच! रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय उभारणी हा... ... संपत्ती मिळवण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे. ... संपत्ती मिळवण्यासाठीचा कोणालाही चोखाळता येणारा मार्ग आहे. ... इच्छा, कष्टांची तयारी आणि जिद्द असलेल्या प्रत्येकासाठी खुला मार्ग आहे. ' मी स्वतः नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामुळे श्रीमंत झालेलो नाही, त्यामुळेच मी या व्यवसायाकडे अधिक तटस्थतेने पाहू शकलो. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामध्ये मला निव्वळ पैसा कमावणे, या पलीकडे जाणारी, त्यापेक्षाही काहीतरी अधिक असणारी मूल्यं जाणवली, ती मी या पुस्तकातून मांडली आहेत. मला स्वतःचं मन आणि हृदय असलेला व्यवसाय अखेरीस सापडलाच!'