-
Eka Maleche Mani (एका माळेचे मणी)
एका माळेचे मणी या पुस्तकातील प्रारंभी मीर हुसेन किरमानी याने लिहिलेल्या टिपू सुलतानाच्या चरित्राचे मराठी भाषांतर आहे. मुस्लीम आक्रमणाचा हा एक मणी बाकीचे मणी म्हणजे जिना, भुत्तो, झिया-उल-हक अशा कट्टर मुस्लीम लोकांबद्दल सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेले लेख आहेत.
-
Hoshwalon (होशवालों)
या पुस्तकासाठी डॉ. ओक यांनी गेल्या ४० वर्षांतील ६० गझलांची निवड केली आहे. यांमध्ये जगजितसिंग यांनी स्वरबद्ध केलेल्या गालिब, निदा फाजली, शाहिद मीर, सईद राही, गुलजार, सुदर्शन फाकीर अशा नामवंत उर्दू, हिंदी शायरांच्या गझलांचा समावेश आहे. या ६० रचनांचा स्वतःला भावलेला अर्थ डॉ. ओक यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.
-
Saundaryache Upasak- Kusumagraj (सौंदर्याचे उपासक-
कविवर्य कुसुमाग्रज हे मराठी मनाला कायम आदरणीय राहिलेलं व्यक्तिमत्त्व. त्यांना साहित्यसंमेलनाचं अध्यक्षपद मिळणं, त्यांचा 71 वा वाढदिवस साजरा होणं अथवा त्यांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, या घटना संपूर्ण महाराष्ट्राला जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या आहेत. अशा काही प्रासंगिक निमित्तानं लिहिलेले लेख आणि त्यांच्या मृत्यूनंतर लिहिले गेलेले लेख यांतून चिकित्सक निवड करून "सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज‘ हे पुस्तक साकार झालं आहे. सुमारे तीन हजार लेखांमधून निवड केली असून, पुस्तकात दोन विभागांत त्यांची मांडणी केली आहे. एकूण 31 लेख आहेत कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंचं दर्शन या पुस्तकातून घडतं.
-
Yugpravartak (युगप्रवर्तक)
"मला मृत्यूची पर्वा अजिबात नाही. ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस तो एक आलेख लिहिलेलाच असतो. त्यामुळे मृत्यू केंव्हा आणि कसा येईल याची पर्वा मी करीत नाही. पण तो जेव्हा येईल तेव्हा मर्दासारखा असावा . मी माझं संपूर्ण शरीर देवतांपुढे वाहून टाकलेलं आहे. त्यांना जे हवंय ते त्या करतील. मला चिंता नाही ." शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहणाऱ्या या पुस्तकात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे लेख आहेत. बाळासाहेब हयात असताना त्यांच्यावर निघालेल्या विविध पुरवण्या आणि विशेषांकातील मान्यवरांचे वाचनीय लेख यात आहेत. त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयीचे अग्रलेख आणि लेख यामध्ये आहेत.
-
-
Jeevan Tyana Kalale Ho! (जीवन त्यांना कळले हो !)
पुलंच्या सहवासातील काही मान्यवर व्यक्तींनी लिहिलेल्या काही भावपूर्ण आणि रंजक प्रसंगांच्या आठवणी "जीवन त्यांना कळले हो' या पुस्तकात समाविष्ट आहेत.
-
Bhavgandh (भावगंध)
"पुलं'नी 1945 च्या सुमारास सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या काही कथा लिहिल्या. मात्र, त्या पुस्तकरूपाने आजवर प्रकाशित झाल्या नाहीत. पुलंच्या स्मृतिदिनानिमित्ताने परचुरे प्रकाशनाच्या "भावगंध' या पुस्तकातून त्या प्रकाशित केल्या आहेत. कथांबरोबरच पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा आणि श्रद्धांजलीपर लेखाचाही त्यात समावेश आहे. "पुलप्रेमी' भाऊ मराठे यांनी त्याचे संकलन केले आहे. "सात-आठ वर्षे "पुलं'वर संशोधन करत आहे. त्यादरम्यान मला त्यांचे अप्रकाशित साहित्य सापडले. विनोदी लिहिणारे पुलं किती गंभीर लिहू शकतात, हे "भावगंध'मध्ये दिसेल. ते वाचताना अक्षरशः वाचकाला रडू येते.'' - भाऊ मराठे "या पुस्तकातील कथांच्या माध्यमातून "रडवणारे पुलं' वाचकांसमोर येतील. रोहिणी भाटे, जितेंद्र अभिषेकी, माडगूळकर, भाऊसाहेब बांदोडकर अशा अनेक दिग्गजांवरील त्यांची व्यक्तिचित्रेही यात आहेत.''- प्रकाशक अप्पा परचुरे
-
Gathoda (गाठोडं )
कालनिर्णय दिनदर्शिकेतील लेख, पत्रलेखन, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले विविध लेख, तत्काली पोलीस आयुक्त वसंत सराफ यांना लिहिलेले पत्र, श्रीकान्त ठाकरे-बाळासाहेब ठाकरे बंधूंना लिहिलेले पत्र, काही कविता असे पुलंचे विविधांगी लेखन यात आहे. - डॉ. श्रद्धानंद ठाकूर ‘गाठोडं’ वाचताना एकसारखं हसू यायला लागलं. पुलंचे शब्द वाचताना ते शब्द आपल्याला ऐकू येतात आणि पुलं स्वत:च समोर बसून गप्पा मारतात, असा भास होतो. एका अर्थाने पुस्तक वाचताना माझ्या स्मृतींचं गाठोडं उलगडलं. ‘पीएल’सोबत गप्पा, गाणं ऐकणं हा आमच्यासाठी जणू उत्सवच असायचा. पुलं म्हणायचे ‘माझ्या भोवती रसिकतेचा महापूर असावा आणि मी त्यातील पूरग्रस्त’. ‘गाठोडं’ वाचतानाही आपली अशीच स्थिती होते, पुलं पर्वातील मी प्रवासी आहे