-
Khauchya Goshti (खाऊच्या गोष्टी)
वेगवेगळे पदार्थ तर सर्वांनाच खायला आवडतात. पण एखादा पदार्थ कोणी तयार केला, त्याला ही कल्पना कशी सुचली हे मात्र आपल्याला माहीत नसतं. उदा सँडविच, कॉफी, वॉल्डॉर्फ सॅलड… बेकर्स डझन सारख्या काही गोष्टी अगदी खाद्यपदार्थांच्या नाहीत पण त्यांच्याशी संबंधीत नक्कीच आहेत. रायाला अश्या गोष्टी जमवण्याचा छंद होता. या गोष्टी खूपच रंजक आणि माहितीपूर्ण आहेत.
-
Majhi Sutti Goa (माझी सुट्टी गोवा)
फिरायला जायला सगळ्याच लहान मुलांना आवडतं. आणि सुट्टीत गोव्याला जायचं म्हणजे तर एकदम धमाल! गोवा म्हणजे समुद्र, मासे, काजू, चर्चेस, मंदिरं आणि किती काय काय... घरबसल्या आणि पुनःपुन्हा सहलीचा आनंद देणारी पुस्तकमालिका!
-
Majhi Sutti Rajasthan (माझी सुट्टी राजस्थान)
राजस्थान म्हणजे रंगांचा उत्सव! तिथे वाळवंट तर आहेच, पण आणखीही थाउजंड मिलियन सिक्स्टी-फोर गोष्टी आहेत बघायला... घरबसल्या आणि पुनःपुन्हा सहलीचा आनंद देणारी पुस्तकमालिका!
-
Pustak N Vachanari Mulagi (पुस्तक न वाचणारी मुलगी )
मीनाच्या आई बाबांना पुस्तकाची प्रचंड आवड असते. त्यामुळे त्याचं सगळं घर पुस्तकांनी भरलेलं असतं. घरात अशी एकही जागा नसते जिथे पुस्तकं दिसणार नाहीत. मीनाला मात्र पुस्तकं अजिबात आवडत नसतात. ती पुस्तकांकडे ढुंकूनही बघत नसते. पण अचानक एक चमत्कार घडतो आणि पुस्तक न वाचणारी ही मुलगी पुस्तकात रमून जाते.
-
Reshatan Athavanincha Pravas (रेषाटन आठवणींचा प्रवास)
प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची वाटचाल सांगणारं आत्मकथन. आजपर्यंत फडणीस यांच्या चित्रांनी वाचकांना मनसोक्त हसवलं. आता या चित्रांचा आणि चित्रकर्त्यांचा प्रवास या पुस्तकातून कळणार आहे. या आत्मचरित्रामुळे व्यंगचित्रकारांचा संघर्ष आणि त्यांचे कष्ट लोकांसमोर येणारे आहेत. मुळात आपल्याकडे चित्रकार आणि चित्रकलेसंबंधीची पुस्तके कमी आहेत. फडणीस यांचे आत्मकथन नव्या चित्रकारांना प्रेरणा देणारे ठरेल, यात शंका नाही.
-
-
-
-
Ramayan
The priceless heritage of India has played a most significant role in the culture of Asia and the Far East. This work of Valmiki consists of more than 24,000 Shlokas [stanzas]. It centered around Lord Rama, an incarnation of the Supreme personality of God Krishna. It portrays the victory of Good over evil.