Postmortem (पोस्टमॉर्टम्)
'वॉर्ड नंबर पाच, केईएम' या पुस्तकाने चर्चेत आलेले डॉ. रवी बापट यांचे नवे पुस्तक " पोस्टमार्टेम' मनोविकास प्रकाशनाकडून प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणजे वैद्यकीय व्यवसायाचा लेखाजोखा यामध्ये मांडण्यात आला आहे. डॉ. बापट गेली 52 वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत. या व्यवसायात झालेले बदल डॉक्टरांना अस्वस्थ करणारे आहेत. त्यातूनच हे पुस्तक साकारले आहे. डॉक्टरांच्या या पुस्तकाची सहलेखिका आहे सुनीती जैन. आपल्या आईंच्या आजारपणात आणि नवऱ्याच्या आजारपणात त्यांना मुंबईतील सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. या दोन्ही रुग्णालयांच्या क्षमता आणि त्याच्याकडून मिळणारी सेवा याबद्दल त्यांना जे अनुभव आळे त्यावरून त्यांनी काही निष्कर्ष काढले ते या पुस्तकातच आहेत. वैद्यकीय सेवा ही मानवतेची सेवा आहे. त्याला जे सध्या बाजारीकरणाचं रुप आलं आहे. त्यामुळे या व्यवसायातील रवी बापट आणि सुनीती जैन यांच्यासारखी मंडळी अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. या अस्वस्थतेतून हे पुस्तक आकाराला आले आहे.