Hi Rajbhasha Ase! (ही राजभाषा असे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा हा संग्रह. थेट रोखठोक, धारधार भाष हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांचे विचार उत्स्फूर्त आहेत आणि ते मांडण्याची प्रभावी हातोटी त्यांच्याकडे आहे. पक्षस्थापनेनंतर त्यांनी पहिली सभा शिवतीर्थावर घेतली २००६मधील ते पहिले भाषण अर्थात पुस्तकाच्या प्रारंभीच वाचायला मिळते. याच वर्षी महाराष्ट्राने शरमेने मान खाली घालावी, अशी घटना खैरलांजी येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी अत्यंत परखड विचार मांडणारी सभा घेतली. कोकण महोत्सवानिमित्त २००८ मध्ये त्यांनी मुंबईत भाषण केले होते. राज ठाकरे यांना रत्नागिरीत अटक करण्यात आली होती. या अटक आणि सुटकेनंतर त्यांनी ठाणे येथे सभा घेतली. आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ त्यांनी घेतलेल्या सभेतील भाषणाचा सामावेशही पुस्तकात करण्यात आला आहे.