Gulmohar

By (author) Va.Pu.Kale Publisher Mehta Publishing House

गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्‍हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्‍या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्‍या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.

Book Details

ADD TO BAG