Yugdrashta Maharaja (युगद्रष्टा महाराजा)

By (author) Baba Bhand Publisher Saket

देशात स्वातंत्र्यपूर्व काळात पाचशे ते सहाशे संस्थाने होती. या संस्थानांपैकी पुरोगामी राजा म्हणजे सयाजीराव गायकवाड. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना मदत करणारे सयाजीराव ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणार्‍या क्रांतिकारकांनीही मदत करत होते. साहित्य, कला, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा सर्व बाबींना उत्तेजन देणारा हा राजा सर्वार्थाने वेगळा होता. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांनी अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे. 528 पानांच्या या कादंबरीत सयाजीरावांचे अनेक पैलू लेखकाने मांडले आहेत. सयाजीराव किती मोठे होते, हे या कादंबरीने सहजपणे लक्षात येते. लेखकाने खूप मोठा काळ अत्यंत ताकदीने उभा केला आहे. Authors: बाबा भांड

Book Details

ADD TO BAG