Meluhache Mrutyunjay (मेलुहाचे मृत्युंजय )
भगवान शिव म्हणजे देवांचा देव. त्याचे वास्तव्य कैलास पर्वतावर असल्याचे भारतीय संस्कृतीत समजले जाते. या दैवताचे पूजन माणसांप्रमाणे असुर, दैत्यही करत आले आहेत. पण या पौराणिक व्यक्तिरेखेचे चित्रण मानवरूपात करून त्याची विलक्षण कथा आमिश यांनी गुंफली आहे. दंतकथेचा वापर करून त्याचा संदर्भ मेलुहाचे मृत्यूंजय मध्ये आधुनिकतेशी जोडला आहे. म्हणूनच ही कादंबरी नेहमीपेक्षा वेगळी व वाचनीय आहे. एका अवखळ मुलाचा महादेवापर्यंत झालेला प्रवास यात मांडला आहे. तो सर्वस्वी अनोखा व विलक्षण आहे.