British Riyasat (East India Company-Uttarardha) (ब
ब्रिटिश रियासती’च्या दोन खंडांमध्ये इ.स. १४९८ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामाने भारताच्या पश्चिम किनार्याला आपले व्यापारी जहाज लावले तेव्हापासून १८५७ सालचा स्वातंत्र्यलढा मोडून काढत संपूर्ण भारतभर ब्रिटिश सत्तेचा विस्तार झपाट्याने झाला तोपर्यंतचा इतिहास आला आहे. ब्रिटिश कंपनीबरोबरच पोर्तुगीज, फ्रेंच, डच इत्यादी व्यापारी कपन्यांनीही आपले व्यवहार या देशाच्या किनार्यावर सुरू केले आणि त्या कंपन्यांचे व्यापार, त्यासाठी होणारी त्यांची स्पर्धा, त्यातून निर्माण झालेले संघर्ष यांचाही इतिहास या खंडांमध्ये येतो. १८५७ नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा येथील सत्ताधीशांशी वाढलेला संबंध आणि वाढलेला राजकीय हस्तक्षेप यांमुळे एतद्देशीय सत्ताधीशांवर त्यांना मात करता आली आणि युरोपीय व्यापारी कंपन्यांच्या स्पर्धेतही ब्रिटिश कंपनीला यश मिळाले. या दोन्ही घटनांचा परिपाक म्हणून ब्रिटिशांची सत्ताकांक्षा वाढत गेली. त्यासाठी त्यांनी मोगल, मराठे, अवधचे नबाब, बंगालचे सुभेदार, निजाम, हैदर, टिपू यांच्यात झुंजी लावल्या. प्रसंगी त्यांच्याशी मैत्री केली आणि शेवटी त्यांच्यावर तैनाती फौजा लादल्या आणि आपल्या सत्तेचे क्षेत्र वाढवले. हे सर्व कसे घडत गेले? ब्रिटिश रियासतींत हा सर्व इतिहास विस्ताराने आला आहे. दोन खंडांची मिळून पृष्ठसंख्या - १२०० पुठ्ठाबांधणी व आकर्षक बॉक्ससह