Sthitpragya Darshan (स्थितप्रज्ञ-दर्शन)
बुध्हि कुणाच्या ठिकानीं कमी असो, कुणाच्या ठिकानीं अधिक असो, त्याचें महत्व नाही. महत्व आहे स्वच्छ बुध्हिचें. अग्नीची एक लहानशी ठिणगी कापसाच्या ढीगाली जाळू शकते. उलटपक्षी भला मोठा कोळसा असला तरी तो दाबुन जातो. बुध्हिच्या कमीजास्तपाणाचा प्रश्न नाही. निखल बुध्हिची एक लहानशी ठिणगी, एक लहानशी ज्योत असली तरी पुरें. बुध्हिच्या शक्तिची हीच खूबी आहे. शारीरिक शक्तिचें तसें नाही. एखाद्या अल्पबुध्हीच्या आणि अशिक्षित मानासालाही या जन्मात स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता नि:संशय आहे. त्याला भाराभर बुध्हिची गरज नाही. प्रज्ञेची एक ठिणगी पुरे.