Shesh-Vishesh (शेष-विशेष)
गंभीर जीवनदृष्टी असणार्या व्यक्तींच्या लेखनात त्याच्या जीवनदृष्टी निखळ प्रत्यय येत असतो. त्याच्या लेखनात आपोआपच ती कळत- नकळत पझारत असते. लिहणार्याला चकवूनसुद्धा ती कधी कधी लेखनात उपस्थित होते. लिहणार्यालाही ती अश्चर्याच्या धक्का देत असते. हे सारे विवेंचन एवढ्याठी की कोणताही लिहिणारा एक कृति करत असतो. त्या कृतीत त्यांची जीवनदृष्टी भूमिका या सार्याची जाणीवपूर्वक उपस्थित असते. लेखकाच्या त्या कृतिवारून तो समाजातल्या कोणत्या वर्गाचा बाजुच्या आहे याचा निर्णय क्षणार्धात लागत असतो. त्याच्या आस्थेच्या परिघचा विस्तार आणि जगण्याचा पैस आकालत असतो.