Cinematala Shivaji Te Neta (सिनेमातला शिवाजी ते ने
चित्रपटविषयक लेखन करणारे ज्येष्ठ स्तंभलेखक इसाक मुजावर यांचे हे पुस्तक. "सिनेमातील शिवाजी' या लेखनापासून सुरू होणाऱ्या या पुस्तकातील शेवटचा लेख "पडद्यावरचा नेता, पडद्यामागचा दाता' हा निळू फुले यांच्यावर आहे. सिनेमात शिवाजी महाराजांचे चित्रण कसे झाले याचा अभ्यासपूर्ण आढावा पहिल्याच लेखात घेण्यात आला आहे. यातील सर्वच लेख वाचनीय तर आहेतच; शिवाय चित्रपटसृष्टीची सखोल आणि अपरिचित अशी माहिती देतात.