Kharicha Vata (खारीचा वाटा)
एक निसर्गरम्य खेड. तिथ वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानी पाळलेली खार. सम्रुध्द निसर्ग, पिकपाणी, रानमेवा, जानवर, करामाती मित्र यांत रमलेला, गुंगलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधनारे मशिनारिची घरघर , थोड्याच दिवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथेच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.