Don Dhurvanvar doon pavel ( दोन ध्रुवांवर दोन पावल

By (author) Suhas Mantri Publisher Suhas Mantri

पर्यटनाला जायचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर भारतातील प्रसिद्ध ठिकाणे वा भारताबाहेरील अमेरिका , सिंगापूर, लंडन अशी मोजकीच नाव येतात. पण अंटार्क्टिका वा आर्क्टिक ही नावं पुढे येणं याची सुतराम शक्यता नाही किंवा अशा प्रकारच्या प्रवासाला जाण्याची इच्छा बाळगणार्यांकडे आपलं भारतीय मन जरा संशयानं पाहते. कारण ह्या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पैसा व धाडस या दोन्हीची आवश्यकता असते. बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या सुहास मंत्री ह्यांनी मात्र हे धाडस केलं.मुळातच प्रवासाची आवड असणार्या मंत्री ह्यांनी या दोन ध्रुवांची सफर करण्याचा निश्चय केला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला. आणि त्यातूनच हे पुस्तक आकाराला आले. या पुस्तकात पेंग्विन, हिमनग तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती वाचायला मिळते. आर्क्टिकवरील ट्रॉम्सो गावातील नॉर्दर्न लाईट्सचा प्रत्यक्ष अनुभव लेखकाला स्तिमित करून टाकतो.सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असताना भर दुपारी गाव दिव्यांमध्ये कसे उजळून निघते याचे मनोहारी वर्णन लेखकाने केले आहे. या दोन्ही ध्रुवांवरील निसर्गाची किमया अनुभवताना लेखकाचे मन अचंबित होऊन जाते आणि त्यांनी केलेल्या अनुभवाच वर्णन वाचताना वाचकालाही ते अचंबित करून जाते. या पुस्तकातून वाचकाला दोन्ही धृवाची सफर घडेल हे निश्चित.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category