Kanchangangechya Kushit (कांचनगंगेच्या कुशीत)
कांचनगंगा शिखर आणि त्याच्या आसपासचा भूभाग म्हणजेच महाभारत काळातील किरात राजांचा प्रदेश. दऱ्यांमागून दऱ्या, घनदाट जंगलं, असंख्य प्राणी-पक्षी, मुळात हा सर्व परिसरच अस्पर्श अशा निसर्गसौंदर्यानं भरलेला आहे. येथील अभयारण्ये जगातील निसर्गदत्त वारसाहक्क स्थळांपैकी एक आहेत. जोसेफ हूकर सारखे वनस्पती शास्त्रज्ञ येथील निसर्ग सौंदर्याने भारून गेले होते. निसर्गाच्या जोडीला हा परिसर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अंगाने देखील समृद्ध आहे. जगातील तिसरे सर्वोच्च शिखर म्हणून या कांचनगंगा शिखराला लौकिक प्राप्त झाला आहे. कांचनगंगा शिखर रांग खूप मोठी आहे. या शिखराला अनेक नावांनी ओळखतात- कांचनगंगा, खान्नचेनझोंगा, कांगचेनजुंगा इत्यादी. याच्या 'कांग-चेन-झोन्गा' या तिबेटी नावामध्ये आणखी एक अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे पाच ऊर्जास्रोतांचा साठा किंवा उगम. अशा या शिखराच्या पायथ्याशी केलेली मनसोक्त भटकंती म्हणजे हे पुस्तक