Vishayantar (विषयांतर )

By (author) Chandrakant Khot Publisher Dimple

...वास्तव सलगपणे बघू नं शकाणं किंवा अनुभवाची एकसंधाता न साधू शकाणं हेच महानगरी लेखकाचं वास्तव आहे. खोत त्याचाशी प्रमाणिक राहिले आहेत आणि सतत अनुभवांचा गुंतवळा मांडत राहण्याचा प्रयत्न करत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कादंबर्‍यांत कथानप्रधानतेला पूर्णपणे फाटा आहे... त्या वास्तावाशिच नाळ ठेवून आहेत. पण त्यातली असंगतता, अतार्क्यता जशी आहे तशी स्विकारातात... त्या कुठलाही पवित्रा घेत नाहीत. उलट पवित्रा घेणार्‍यांशीच दावा मांडतात. त्यांचं अंत:सूत्र पक्कं असलं तरी वरकरणी तय विस्कळीतपणे व्यक्त होतात. हा विस्कळीतपणे एका गरजेतूनच येतो. अनेकदा कथेचा मुख्या प्रवाह सोडून ते असंबन्ध गोष्टीत घुसतात. कुठल्यातरी पूर्वीच्या आठवणींचे किस्से, कोणाचे तरी विनोद, दृष्टांत कथा, सुभाषितवजा वाक्यं, कवितांच्या ओली असे तुकडे अधुनमधुन पेरत रहातात. मूळ गोष्टीशी तादात्म्य होऊ डेट नाहीत. 'विषयांतर' मध्ये तर गोष्टही नाही, नुसतेच मुद्दे आहेत... जणू एक अनुभांचं अराजक खोत निर्माण करतात. त्यामुळे आधुनिकतावाद्यांच्या कालात लेखन करणारे खोत मला उत्ताराधुनिकतावादी वाटतात. खोत गिरणगावातले. मीही गिरणगावातलाच. त्यामुळे त्यांच्याविषयी मला आदर आणि आत्मीयता तर आहेच, पण इतका महत्वाचा लेखक आपल्या अवतीभवती होता, जी हवा मी छातीत भरुन घेतली तीच हवा त्यांचाही फुफ्फुसांतुन वाहत होती आणि आम्हा दोघांच्या दिक्यावर एकच आसंमत छत्री धरून होता याचं अप्रूप माला आहे आणि ते कायम वाटत राहणार आहे.

Book Details

ADD TO BAG