Legosache Divas (लेगॉसचे दिवस)
एका साध्या, चौकस, उत्साही आणि मनमोकळ्या वृत्तीनं तुम्ही लेगॉसमध्ये राहिलात. त्यामुळे हे पुस्तक छान झालं आहे. आधुनिक काळात एखाद्या सिंदबादच्या सफरीला गेल्यासारखं हे पुस्तक वाचताना वाटतं. लेगॉसमध्ये गेल्यावर तेथील वातावरण पहाता आपल्या मनाची दारे घट्ट बंद करावीशी वाटणं अगदी शक्य होतं. परंतु तुम्हाला तसं वाटलं नाही. त्यामुळेच तिथल्या जीवनाचं तुम्हाला इतकं सर्वांगीण दर्शन घडलं. विनोदबुद्धी जिवंत ठेवल्याशिवाय लेगॉसमध्ये दिवस काढणं कठीणच होतं. तुमच्या विनोदाचा झरा या पुस्तकात सतत झुळझुळत राहातो. हा विनोद वरपांगी केलेला नाही. सर्व पुस्तकच विनोदी व्हावं असा अट्टाहास तुम्ही केलेला नाही. सहजरित्या ठिकठिकाणी तो अवतरतो. इतकं चांगलं पुस्तक लिहिल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !