Vaidyakacha Bajar (वैद्यकाचा बाजार)
डॉ. श्रीराम गीत यांनी या पुस्तकात एका वेगळ्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रात ज्या गैरप्रवृत्ती शिरल्या आहेत त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. हल्ली आजारी पडणं हे महाखर्चिक झालं आहे असं सर्रास बोललं जातं. याच मुद्द्याचा त्यांनी सविस्तर वेध घेताना विविध आजार, त्यावरील उपचार पद्धती, तसंच कोणत्या बाबींमुळे खर्च वाढतो, याची चर्चा केली आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायातील निरीक्षणे, विविध सेमिनारमधील सहभाग, त्यानंतर एका रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सहभागी झाल्यावर घेतलेला सहभाग यातून आलेला अनुभव याआधारे त्यांनी काही निष्कर्ष या पुस्तकात नोंदवले आहेत. वैद्यकीय व्यवसायाची चिकित्सा, त्याचबरोबर आपलं शरीर कसं चांगलं राखलं पाहिजे व काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी नेमकं मार्गदर्शन व जागरूक करणारं हे पुस्तक आहे.