Timepass

टाईमपास’ ही एका अपरिमित उर्जा व धैर्य असलेल्या बुद्धीमान स्त्रीची कहाणी आहे. ही स्त्री स्वत:च्या मनाला पटेल त्याच प्रकारचं आयुष्य जगली, स्वत:च्या जबाबदारीवर जगली. ही विलक्षण स्त्री म्हणजे सुप्रसिद्ध मॉडेल आणि ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी. 1949 साली जन्मलेल्या प्रोतिमा बेदी यांचा मृत्यू 1998 साली एका दुर्दैवी अपघातात झाला.या अवघ्या 49 वर्षांच्या आयुष्यात त्या अतिशय वादात्मक आणि अपवादात्मक वेगळ्या घटनांनी व्यापलेलं जीवन जगल्या. 'टाईमपास’ बनलंय ते प्रोतिमा बेदींच्या आत्मचरित्रातील काही अंश, त्यांच्या रोजनिशीतला काही भाग, आणि त्यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबिय, प्रियकर यांना लिहिलेल्या पत्रांवरुन 'टाईमपास मध्ये प्रोतिमा बेदींच्या अत्युत्कट स्मृती आहेत..... अगदी मुक्तपणे लिहिलेल्या. आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर 'वळण’ बनणार्‍या सगळ्या घटना प्रोतिमा बेदींनी अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्भिडपणे मांडल्या आहेत. स्कॅन्डलस् मॉडेल, बिनधास्त तरुणी, समर्पित नृत्यांगना..... अशी प्रोतिमा बेदींची विविध रुपं 'टाईमपास’ मध्ये पाहायला मिळतात. हातचं काहीही राखून न ठेवता अतिशय मनमोकळेपणे मांडलेलं हे आत्मकथन आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category