Rahasya Naganche ( रहस्य नागांचे )
आज तो देव आहे चार हजार वर्षापूर्वी तो फक्त एक पुरुष होता . शोध सुरूच आहे. अशुभसुचक नाग योध्याने त्याच्या मित्राला बृहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुवून लागला आहे. तिबेट हून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही , मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्रीच होती . द्वेषी सैतानाच्या उद्याचा पुरावा सर्वत्रच आढळतो . एका जादुई औषधावर अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्यू पंथाला लागते . एका अन्भिशीक्ता राजकुमाराचा खून होतो . शिवाचे तत्वज्ञान विषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवावर शिवाचा गाढ विश्वास असतो . मात्र द्रुष्टांचे सहाय्य घेऊन ते त्याचा विश्वासघात करतात . अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलूहा सुद्धा जन्माचे शहर म्हणून ओळखल्या जाणऱ्या मैकाम मधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते. शिवाला अज्ञात असलेला मुख्य सुत्राधर एक मोठाच खेळ खेळत असतो. प्राचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टीनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की , जसे वाटत होते तसे तिथे काहीच नव्हते. भयानक युद्ध खेळली जतिल. आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील . शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील ' मेलुहाचे मृत्युंजय ' हे पहिले पुस्तक . त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल .