Bakhar Sambhaji (बखर संभाजीची)
महाराष्ट्राच्या पावन भूमीवरील एक अनोखे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र तुळापूर. भामा ,भीमा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या क्षेत्राने महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना पाहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासावर उमटलेली लखलखती, देदी प्यमान विद्युतरेखा म्हणजे छत्रपती संभाजीमहाराज. आपल्या अल्प कारकिर्दीतही सं भाजी महाराजांनी बजावलेल्या चतुरस्त्र कामगिरीला तोड नाही. मुघलांपासून ते पोर्तुगिजांपर्यंत स्वराज्याच्या सर्व शत्रूंना आपल्या समशेरीची जरब बसणारे शंभूराजे कवी प्रतिभेच, संवेदनशील राज्यकर्ते होते. या तेजस्वी पुरुषाची ओजस्वी गाथा सांगणारया या पुस्तकात जिथे संभाजी महाराजांनी वीरमरण पत्करले त्या तुळापूर परिसराचा इतिहास, भूगोल, संस्कृती यांचा वेधही घेतलेला आहे.