Manasi
काय दिलं माझ्या प्रेमानं ? फक्त दु:ख... ? ऑसमंडच्या गाण्याचा मुखडा आहे बघ, 'लव्ह इज ओन्ली फॉर टुडे'. प्रेम फक्त आजच्यापुरतंच, या क्षणापुरतंच असतं. ते आज जगून घे. हे खरं असावं, पण कळलं कधी नाही. माणसाच्या मनाचीच नाती खरी, हे गृहीतक होतं माझं. प्रेमाबरोबर मीही एक नातं विणायला घेतलं. सामाजिक नात्याला झुगारून... तरीही सामाजिक होतंच ते... मग लक्षात आलं, की माणसाच्या मनाच्या नात्याला तर स्थानच नाहीये आणि किंमतही. सत्य हे की, सामाजिक नात्यांचा शिक्का खोलवर रुतून बसलाय आपल्या मानसिकतेत. एखाद्या गुणसूत्रासारखा रुजलाय आपल्यात.