Safari Afriketli (सफारी आफ्रिकेतली)
जंगल हे ठिकाण असे असते जिथे तुम्ही जर चुकीचे वागल्यास कोणाच्या तरी तोंडचा घास होऊ शकता! कारण या जंगलात असतात, घातक शिकारी प्राणी,चिडलेले हत्ती आणि जगातले सर्वात बेभरवशाचे प्राणी- म्हणजे,बेलगाम पर्यटक आणि अविचाराने धाडस करणारे सफारी गाईड! या सगळ्याचे चित्रण लेखकाने या पुस्तकात केले आहे. अंगावर धावून येणाऱ्या सिंहाचा लेखकाने दोन वेळा कसा सामना केला,ब्रिटीश राजघरयाण्यातून आलेल्या झिंगलेल्या अर्धनग्न पर्यटकाचा रात्रीच्या अंधारात कसा शोध घेतला,पर्यटकांनी भरलेली ल्यांडरोव्हर गाडी पाणघोडे असलेल्या जलप्रवाहाच्या घेऊन गेल्यावर कशी तारांबळ उडाली,आणि आफ्रिकेतल्या सर्वात धोकादायक प्राण्याला त्याने आपला पाळीव प्राणी कसे बनवले,असे विविध अनुभव लेखक गोष्टीरूपात सांगतो. नर्मविनोदी शैलीतले हे अनुभव वाचतान कधी भीतीने अंगावर काटा उभा राहतो,तर कधी हसून-हसून पुरेवाट होते,तर कधी डोळ्यात पाणी उभे राहते.