Mi Krushna Aahe (मी कृष्ण आहे )
मी कृष्ण आहे - मन आणि जीवनाचा नियंता ‘मी कृष्ण आहे’ हे पुस्तक म्हणजे जगातील आजवरचे सर्वाधिक प्रभावी व्यक्तिमत्त्व असणार्या कृष्णाच्या जीवनाला ऐतिहासिक स्वरूपात प्रस्तुत करण्याचा जगभरातील पहिलावहिला प्रयत्न असून, कित्येक शतकांपूर्वी जन्मलेल्या कृष्णाची सायकोलॉजिकल यात्रा यात रेखाटण्यात आली आहे. अधिकृत दस्तावेज तसेच शास्त्रांमध्ये नमूद केलेल्या प्रसंग आणि उल्लेखांच्या आधाराने ही जीवनगाथा साकारण्यात आली आहे. प्रथमपुरुषी रचनाबंधात लिहिलेल्या या पुस्तकात कृष्णाचे विचार उलगडत जातात आणि त्याने कधी, काय केले याबरोबरच त्याने ते ‘का’ केले हेही स्पष्ट होत जाते. सर्वातमहत्त्वाचे म्हणजे, हे पुस्तक ही बाब अधोरेखित करते की कृष्ण हे जन्मत:च भगवान नव्हते तर आपल्या कर्मातून त्यांनी ती उंची गाठली. एखाद्याला ईश्वरावतार मानणे वा भगवान बनणे हे जणु त्यांचे विधिलिखितच होते असे गृहित धरणे म्हणजे त्या व्यक्तीकडून वा त्यांच्या महान आयुष्याकडून काहीही शिकण्याची सारी दारे बंद करण्यासारखे आहे. वास्तवत: कृष्ण ही आजवरच्या मानवी इतिहासातील एकमेव अशी व्यक्ती आहे जिच्या ठायी परिपूर्ण व्यक्तित्व आहे; तो एकमेव पूर्ण पुरुष आहे. त्यामुळे त्येकासाठीच त्याच्या जीवनाकडून शिकण्यासारखे अमाप आहे. कृष्णाचे व्यक्तिमत्त्व कमालीचे प्रभावशाली होते याविषयी दुमत असणार नाही. कृष्ण- एक कलाकार, एक प्रेमी, एक राजकारणी, एक सायकोलॉजिस्ट, एक व्यावसायी, एक द्रष्टा, आणि एक गुरू.त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या या विविध छटांना या पुस्तकात तपशीलवार रेखाटण्यात आले आहे. तो एक गवळी होता जो पुढे द्वारकाधीश बनला. संघर्षमय आयुष्यही हसत जगण्याची कला तो जाणून होता. त्याचे जीवन म्हणजे शून्यातून सृजन करण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.