Dattak Putra (दत्तक पुत्र)
दत्तक घेणार्या पालकांची, विशेषतः आईची मनोवस्था फार संवेदनशीलपणे या पुस्तकात मांडली आहे. ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. नीला सत्यनारायण यांची आधीची ओळख एक आय.ए.एस. ऑफिसर म्हणून असली तरी आता त्या साहित्याच्या प्रांतात चांगल्याच रमल्या आहेत. त्यांची आजवर 26 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्रशासकीय सेवेत स्थान मिळावे म्हणून त्यांचे विशेष प्रयत्न आहेत.