Halya Halya Dhudhu De (हाल्या हाल्या दुधू दे)
न्यानबा शेतकऱ्याची मन हेलावून टाकणारी ही कथा आपल्याला अंतर्मुख करते. दुष्ट हाल्या कुठल्या ना कुठल्या रूपात वावरत असतोच. तो कुणाचीच कदर करत नाही. भुलभुलय्या निर्माण करून तो माणसाला चकवतोच! न्यानबा हाल्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचे सारे कुटुंबच दु:खाच्या गर्तेत ओढले जाते...! न्यानबा संकटांना तोंड देता देता पराभूत होतो. काय आहे न्यानबाच्या जीवनाची ही शोकांतिका? एका शेतकऱ्याची शोकान्तिका समर्थपणे चितारणारी बाबाराव मुसळे यांची विलक्षण कादंबरी.