Zund (झुंड)
पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विशाल. तालुक्याच्या गावी त्याचं घर. घरी आई वडील आणि लहान बहीण. वडील मजुरी करणारे. आई गृहिणी. बहीण अजून शिकतेय. एका बड्या असामीला गावात मध्यवर्ती भागात एक भव्य इमारत बांधायची आहे. विशालच्या वडिलांनी बांधलेलं यांचं छोटंसं घर त्याच्या आडवं येतं. त्या वादाचा तोडगा काढण्यासाठी विशाल पुण्याहून गावी येतो. येतो तो अडकतो. तालुक्यातलं राजकारण, आई वडील, इतर नातेवाईक आणि त्याची नव्याने झालेली जीवनसाथी या सगळ्यांमध्ये गुंतत जातो. एका बाजूला राजकारणाल्या कुरघोड्या, लढाया, हाणामारी, अपहरण आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाकडून मिळालेली साथ, प्रेम आणि झुंडीसोबतचे ऋणानुबंध. राजकारणी आणि व्यवसायातल्या बड्या ध्येंड्यांशी दोन हात करताना त्याच्या पाठीशी उभी राहते तरुण पोरांची झुंड. विशालच्या झुंडीची ही कथा. वाचकाला सकारात्मक भावनिक अनुभव देणारी उत्कंठावर्धक कादंबरी.