Heads You Win (हेड्स यु विन)

अलेक्झांडर कारपेन्कोला बालपणापासूनच स्पष्ट दिसत असतं की, तो देशवासीयांचं नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आला आहे; पण राज्य वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या वडिलांची ‘केजीबी’द्वारे हत्या होते, तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या आईबरोबर रशियातून पळ काढावा लागतो. गोदीवर त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात – त्यांनी अमेरिकेला जाणार्‍या जहाजाच्या कंटेनरमध्ये चढावं की ग्रेट ब्रिटनला जाणार्‍या, याची निवड अलेक्झांडर नाणं उडवून करतो... एका क्षणात, अलेक्झांडरच्या भविष्याला दुहेरी कलाटणी मिळते. दोन खंड आणि तीस वर्षांच्या काळाची व्याप्ती असलेल्या या भाग्य आणि भविष्याच्या दंतकथेमध्ये, एक स्थलांतरित म्हणून नवीन जगावर राज्य करण्याच्या त्याच्या जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवर आपणही स्वार होतो. अलेक्झांडरची ही अद्वितीय कथा उलगडत असताना, आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याची त्याला जाणीव होते आणि शेवटी रशियातील भूतकाळ आपली पाठ सोडणार नाही, हे तो स्वीकारतो.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category