The Princess (द प्रिन्सेस)
भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच्या संस्थानिकांच्या मानसिकतेचं चित्रण ही कादंबरी करते. त्या निमित्ताने त्या वेळचा संस्थानांचा कारभार, संस्थानिकाच्या पत्नीचं जीवन, संस्थानांमधील सामाजिक-सांस्कृतिक जीवन, तिथल्या चालीरीती, त्यांचा डामडौल इ. वर्णन या कादंबरीत येतं. दादा हे बेगवाड या छोट्याशा संस्थानाचे अधिपती. संस्थानिक असल्याचा अभिमान त्यांच्या नसानसांत भिनलेला असतो. त्यांचा मुलगा अभय लहानपणापासून संस्थानिक वातावरणात वाढलेला असतो. दादांचं आणि अभयचं वैवाहिक जीवन, त्यांची अंगवस्त्रं याच्या चित्रणातून संस्थानांमधील स्त्री-जीवन समोर येतं. हिंदुस्थानातून ब्रिटिशांची सत्ता हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना संस्थानांचं अस्तित्व राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण होतो आणि दादांमधला कट्टर संस्थानिक अस्वस्थ होतो. अभय मात्र होणार्या बदलांना सामोरा जायला तयार असतो. दादा हे बदल स्वीकारतात का? संस्थानांचं आणि संस्थानिकांचं प्रातिनिधिक, सर्वांगीण चित्रण करणारी कादंबरी.