Amir Khusro (अमीर खुस्रो)
तेराव्या शतकातील भारतीय कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ज्ञ अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो. सुलतान जलालुद्दीन खिलजीने खुसरोंच्या काव्यरचनेवर खूष होऊन त्यांना `अमीर` हा किताब दिला. या अमीर खुस्रो यांची जीवनकथा उलगडणारे पुस्तक म्हणजे मिलिंद जाधव यांची ही नवी कादंबरी `अमीर खुस्रो`. खुस्रो यांचा जन्म सध्याच्या पंजाबातील पतियाळा येथे झाला. खुस्रोनी फारसी, हिंदवी आणि उर्दू मध्ये काव्यरचना व लिखाण केले. ते उर्दू भाषेतील पहिले कवी. खुस्रो उत्तर भारतीय संगीतातील खयाल गायकीचे, कव्वाली रचनांचे आणि गझल या काव्यप्रकाराचे जनक मानले जातात. खुस्रो दिल्लीच्या तत्कालीन सात सुलतानांचे दरबारी जाणकार, संगीतकार होते. मिलिंद जाधव यांनी खुसरोंच्या जीवनपटासोबतच तेव्हाच्या काळाला देखील वाचकांसमोर उभे केले आहे. खुस्रो यांच्या मूळ लेखनाच्या बरोबरीने त्या लेखनाची प्रक्रिया, खुस्रो यांचा दरबार, समाज आणि वैयक्तिक आयुष्यतील वावर, त्यांनी केलेल्या चर्चा, टीका यांचा समावेश कथानकात केला आहे. तत्कालीन उर्दू, हिंदवी भाषेचा लहेजा वापरत कादंबरीची भाषा नटवली आहे.