Anvat Watevaril Parytan Stale (अनवट वाटेवरील पर्यट
विविध वृत्तपत्रं आणि मासिकांमध्ये प्रसिद्घ झालेल्या अनोख्या पर्यटनस्थळांवरील लेखांचं संकलन या पुस्तकात करण्यात आलं आहे. ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर न जाता, रुळलेल्या वाटांवर न वळता वेगळ्याच ठिकाणांची चाकोरीबाहेरची भटकंती करण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणी आहे. अशा भटक्यांना मार्गदर्शन करणारं आणि नव्या ठिकाणांची ओळख करुन देणारं हे पुस्तक आहे. ज्यांना प्रवासवर्णन वाचण्याची आवड आहे, अशांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव देणारं हे पुस्तक आहे. जम्मू-काश्मिरमधील नुब्रा खोरं, लडाखजवळील मॅग्नेट हिल्स, तवांग, लाहौल-स्पिती, कांगडाचे खोरे व किल्ला, पाँगचा जलाशय, हिमालचलमधील पाच शक्तीपीठं, नाको सरोवर, पराशर तळे, हिलस्टेशन नारकंडा, चांपानेर, विजापूर, उत्तराखंडमधील कटारमल सूर्यमंदिर, अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या, वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या ठिकाणांची संपूर्ण माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. त्या ठिकाणी कसं जायचं, तेथील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, तेथे जाण्यासाठी योग्य काळ, अशी उपयुक्त माहिती लेखक अरुण अग्निहोत्री यांनी या पुस्तकात दिली आहे.