Abhinay Sadhana An Actor Prepares (अभिनय साधना ॲन ॲक्टर प्रिपेअर्स)

By (author) Kamlesh Soman / Konstantin Stanislavsky Publisher Goyal

मॉस्को आर्ट थिएटरची स्थापना करणारे निर्माता-दिग्दर्शक कॉन्स्टिन्टिन स्टॅनिस्लाव्हस्की यांनी अभिनयाचा व नाट्यप्रक्रियेचा सखोल विचार मांडला. नटांनी पात्रे सजीव करावीत, नाटक करताना आपण अभिनय करीत नसून प्रत्यक्ष ते जगतो आहोत, इतका अभिनय स्वाभाविक व वास्तव असणार्‍या नटांनी भर द्यावा, असे स्टॅनिस्लाव्हस्कींचे सांगणे होते. ‘अभिनय साधना’ या ग्रंथात त्यांचा अभिनय कलेविषयी सर्वांगीण विचार समाविष्ट झाला आहे. या विचारांनी पुढे जगभरातील नाट्य परंपरेत-स्वरुपात मूलगामी बदल घडवून आणला. व्यक्तिरेखांमधील बाह्यवर्तन आणि अंतर्मनाचा शोध घेणं, स्टॅनिस्लाव्हस्कीला निकडीचं वाटू लागलं! कुठलीही भूमिका रंगमंचावर वठविण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी वा त्याचा पुरेसा रियाझ, हा अभिनेत्याला करावाच लागतो. या रियाझामध्ये संपूर्ण शरीराचा वापर कसा करायचा, शरीराच्या विशिष्ट हालचाली (देहबोली) कशा आणि कितपत करायच्या, हे अभिनेत्याला समजून घ्यावेच लागते. इतकेच नाही तर, शब्दांची निवड, त्याचे उच्चारण, गायनाचा पुरेसा सराव, चेहर्‍यावरील हावभाव (एक्सप्रेशन) तसेच स्वतःवरचे संपूर्ण नियंत्रण... या आणि या सारख्या गोष्टी नटाला आत्मसात कराव्या लागतात. यातही अभिनय करताना आपला आविर्भाव, अभिनिवेश आणि प्रकट होणारा भूमिकेचा (प्राण)‘मी’पणा व त्याचा विस्तार यांचे भान व जाण असणे, अभिनेत्याला अत्यंत आवश्यक आहे, असेही तो सांगतो. एकूणच, नाटकातून साधेपणा आणि प्रसंगातील वास्तवता व्यक्त होण्यावर स्टॅनिस्लाव्हस्कीचा भर होता. सर जॉन गिलवुड, इज्युइन वख्तांगोव्ह यांच्यासारखे अभिनेते या पद्धतीने प्रभावित झाले. फक्त नाट्याभिनय नाही, तर चित्रपटातील अभिनयासाठीसुद्धा स्टॅनिस्लाव्हस्की पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. याची मोठी साक्ष मार्लन ब्रँन्डो, रॉबर्ट डी निरो, अल पचिनो व भारतातील स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी या सारखे अभिनेते देतात.

Book Details

ADD TO BAG