Manamanatle Rang (मनामनातले रंग)
मनामनातले रंग संपादक : अरुण शेवते माणसाचं जीवन व्यापतात माणसंच… बहुरंगी माणसं… बहुढंगी माणसं… बहुतांची ! काही जण माणसांची आयुष्यं बदलतात तर काही माणसं आपला ठसा ठेवून जातात. या पुस्तकात अशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या एका कोपऱ्याचा मागोवा घेतला आहे, विविध क्षेत्रांतील नामवंतांनी… साहिर लुधियानवी / जावेद अख्तर काश्मिरचा आदिल / राजीव खांडेकर निळू फुले / विश्वास पाटील रोमनाल गडी… इरण्णा / समीर गायकवाड माझी पत्नी नयना / विनय सहस्त्रबुद्धे जस्टिस कृष्णास्वामी चंद्रू / संजय भास्कर जोशी ऑस्कर विनर कार्तिकी आणि निर्माती / पूजा सामंत तृतीयपंथी पद्मश्री मंजम्मा / शुभदा चौकर कवठेकर गुरुजी / द. वि. अत्रे हरित इस्त्रायलचे जनक डॉ. उरीशानी सचिन इटकर तर असा आहे हा बहुरंगी माणसांचा कॅलिडोस्कोप… मनामनातले रंग !