Mana Sarjana
मानवी जीवन 'त्रिमित' आहे. जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे. माणसाचे खरे मोठेपण या तिस-या मितीवर ठरते. अशा व्यक्ती समाजात चारित्र्यसंपन्न आणि आदर्श ठरतात. त्याग, साधेपणा, इतरांच्या गरजांची जाणीव अशा अनेक पैलूंचे दर्शन ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातून घडते, त्यापैकी डॉ. अनिल गांधी 'कनिष्ठिकधिष्ठित' आहेत. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी आपल्या वैद्यकीय विषयाखेरीज, आर्थिक गुंतवणूक, व्यावसायिक नीतिमत्ता, पृथ्वीची व्युत्पत्ती, आदिवासींसाठी आश्रमशाळा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अशा इतरही विषयांवरील आपले चिंतन व्यक्त केले आहे. एकूणच ही आत्मकथा मननीय, चिंतनीय आणि वाचनीय अशी आहे.