-
The Seventh Secret ( द सेव्हन्थ सिक्रेट)
पावलांचा अजिबात आवाज होऊ न देता रेक्स फोस्टर त्या दारापाशी पोहोचला. दाराचं हँडल पकडून त्यानं ते हळूच फिरवलं त्याला कुलूप नव्हतं ! दाराला हलकेच फट पाडून त्यानं पलिकडे नजर टाकली. त्या दारापलीकडे खाली उतरत जाणारा एक जिना त्याला दिसला. आपण एका गुंतागुंतीच्या भुयारी तळघरापाशी येउन पोहोचलो आहोत, असंच त्याला प्रथम वाटलं पण..... दुसर्याच क्षणी त्याचं तोंड आश्चर्यानं वासलं गेलं! त्या जिन्याच्या तळाशी त्याला दुसरा एक फ्युरर बंकर दिसला ! आणि..... आपल्याला काय आढळलंय याची त्याला अकस्मात जाणीव झाली ! ज्याच्या शोधासाठी त्यानं आत्तापर्यंत जिवाचं रान केलं होतं तोच हा जगाला अज्ञात असलेला हिटलरचा गुप्त बंकर होता ! हिटलरच्या भूमिगत साम्राज्यात नेणारी जबरदस्त रहस्यमय कादंबरी ! आयर्विंग वॅलेस यांची प्रचंड लोकप्रिय ठरलेली, 'उत्कृष्ट अनुवाद' म्हणून नावाजल्या गेलेल्या कादंबरीची द्वितीय आवृत्ती.
-
First To Die (फर्स्ट टु डाय)
विक्रमी खपाचे उच्चांक निर्माण करणारा सध्याच्या काळातील लोकप्रिय लेखक जेम्स पॅटरसन यांची एक खळबळजनक रहस्यकथा. वैयक्तिक गंभीर समस्या, सामाजिक सुरक्षेची जबाबदारी आणि नव्यानं फुलणारं प्रेम या तिहेरी पेचात अडकलेल्या लिंडसे बॉक्सर या महिला पोलिस इन्स्पेक्टरची रोमांचक कहाणी. नवपरिणीत जोडप्यांची हत्या करणारा विकृत खुनी आणि त्याला कोर्टासमोर खेचून कडक शासन देण्यासाठी कटिबद्ध झालेला 'वुमेन्स मर्डर क्लब'. भावी सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं रंगवत हनिमून साजरा करणार्या तरुण वधुवरांचे मृतदेह लाजिरवाण्या अवस्थेत उघडकीस येतात. योजनाबद्ध खून करणारा लिंगपिसाट गुन्हेगार एकेक पुरावा मागे ठेवत पोलिसखात्याची मती गुंग करुन सोडतो आणि या रहस्याची उकल करण्यासाठी, स्वत:च्या अडचणीवर मात करुन, लिंडसे बॉक्सर आकाशपाताळ एक करते. तिच्या या धडपडीला उत्तम साथ देतात, अन्य तीन महिला - एक बातमीदार, एक सरकारी वकील आणि एक शवचिकित्सक डॉक्टर - रहस्याच्या या भोवर्यात वाचकही वेगानं फिरत राहतो...
-
Lekhi Bole (लेखी बोले...)
साहित्यविश्वात अलीकडे बोकाळलेल्या अपप्रवृत्तींची ही अफलातून व्यंगचित्रं. एक संवेदनशील चित्रकाराने रेखाटली; पण कुंचल्यातून नव्हे तर लेखणीतून उतरलेली. कितीकांच्या टोप्या साळसूद पणे उडविणारी... - कवितेऐवजी कवयित्रीशी सुत जमवू पाहणाऱ्या लंपट समीक्षकाची. - एकीकडे इतिहासात रमल्याचा आव आणून दुसरीकडे वर्तमानावर 'अर्थपूर्ण' नजर ठेवणाऱ्या कादंबरीकाराची. - लांडलांड बोलून बोलून गळ्यात पडणाऱ्या बिनधास्त कवयित्रीची. - शिवराळ कवितेचा शेणसडा घालून स्वतःभोवती मात्र आरती ओवाळून घेणाऱ्या कवीची. - लेखकाच्या सफाईने गळा कापणाऱ्या पोचलेल्या प्रकाशकाची. - पुरस्कार फिक्स करून मग लिहायला घेणाऱ्या चापलूस लेखकाची. - श्राद्धांजलीची साग्रसंगीत (पूर्व) तयारी करणाऱ्या प्रसिद्धी - माध्यमांची; स्वयंघोषित सांस्कृतिक मुखंडांची. ...आणि इतरही अनेकांची 'यातल्या कुठल्या व्यक्तिरेखा काल्पनिक वाटल्या तर तो दोष मूळ व्यक्तींचा. - ही रवीमुकुल यांची टीप बरचं काही सांगून जाते.
-
Mumbai Dinak (मुंबई दिनांक)
सामाजिक जीवनातील, प्रत्यक्षा-प्रत्यक्ष राजकारणातील जे अंतःस्त्रोत आहेत. हे अंतःस्त्रोत ज्या चिवटपणे परस्परांच्या जगण्याला छेदून-भेदून जातात, त्याचे प्रत्ययकारी शैलीत दर्शन घडविणारी आणि विस्मयचकित करणारी राजकीय कादंबरी.
-
The Last Don ( द लास्ट डॉन)
कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची -- फार कशाला, सार्या जगाची -- डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं’, तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां’चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बर्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द डार्क एरिना’, 'फॉर्च्युनेट पिल्ग्रिम’, 'गॉडफादर’, 'फूल्स डाय’, 'द सिसिलियन’, 'ओमेर्ता’, 'द फोर्थ के’ या त्याच्या याआधीच्या सर्व जगभरात गाजलेल्या कादंबर्या आहेत. 'द लास्ट डॉन’ ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.
-
Elgar. (एल्गार)
शुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस याचा अर्थ ‘सामाजिक जीवना’शी फारकत घेतलेला माणूस नव्हे. ‘माणूस’ हा शेवटी घडतो त्यात सामाजिक परिस्थितीचा वाटाही असतोच, असं मानणाऱ्या श्री. श्री. ना. पेंडसे यांची ‘एल्गार’ ही कादंबरी हिंदू व मुसलमान अशा दोन मित्रांविषयी आहे. रघू आणि कादर या दोन सुशील जिवांची प्रेमकथा. त्यांचा राजकीय स्वार्थानं कसा बळी घेतला, त्याचं वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.
-
Mansachya Goshti (माणसाच्या गोष्टी)
माणूस हां, निरिक्षकाला खुपच गोंधळात टाकणारा प्राणी आहे. तो विसंगत वागातोच, पण कधी कधी अनपेक्षितपणे सुसंगिताही वागतो. कधी खूप प्रेमाने वागतो, टार कधी अकारण आकास ठेवतो. गर्दी जमा करथो, पण गर्दीतही एकटाच असतो. जगण्याची उमेद ठरतो, पण आयुष्यभर कसली ना कसली खान्ताही बाळगतो. माणूस आणि जगाने, माणूस आणि मरण, माणूस आणि स्पर्श, माणूस आणि प्रेम, आशा माणसाशी संबधित नानाविध गोष्टींच्या या कथा आहेत. या माणसाच्या गोष्टी आहेत.
-
Jadu (जादू)
एकच शब्द सारे काही बदलून टाकणारा गेल्या सुमारे वीस दशकांहून अधिक काळ एका पवित्र धर्मग्रंथामधील वचनांचे ज्यांनी वाचन केले, त्यांचापैकी बहुसंख्य लोकांनी त्याचाभोवती एक गुढतेचे वलय निर्माण केले. त्यांचा अर्थाबाबातही गोंधळ आणि गैरसमज निर्माण झाला. इतिहासातल्या काही थोडया लोकांना याची जाणीव झाली. त्यांना कळले की त्यातले शब्द हे एक कोड आहे, आणि एकदा का तुम्हाला ते सोडवता आले - त्याचे गुढ उकलता आले - की एक नवे जग तुम्हाला दिसू लागते. असे हे जीवनच बदलून टाकणारे जग रॉन्डा बर्न त्यांचा जादू या पुस्तकातून खुले करतात. मग सुरु होतो २८ दिवसांचा एक अविश्वसनीय, आश्चर्यचकित करून टाकणारा प्रवास. या प्रवासात तुमच्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी या ज्ञानाचा कसा वापर करायचा हे त्या तुम्हाला शिकवतात. तुम्ही कोणीही असाल, कोठेही असाल, सध्या कोणत्याही परिस्थितीत असाल तरी ही जादू तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा आहे!
-
Aamche Karve Sir (आमचे कर्वे सर)
प्रत्येकाला आपण शिकत असताना ज्या ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवले त्या त्या शिक्शांबद्दल निश्चितच आदर असतो. परंतु काही ठराविक शिक्षक अगदी सर्वांच्याच लक्षात राहतात. याचे मिख्या कारण त्यांनी आपल्या मनावर केलेले, आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे संस्कार! शिक्षकाचे समजावून देऊन शिकवाणे, त्याचे वागणे-बोलणे, अड़ीअड़चणीला स्वतं:हुन मदत करणे हे शिष्याच्या मनावर खोल ठसा उमटाविते. या सर्वांमध्ये मुख्य गोष्ट असते ती शिक्षकाच्या मनातील भाव! तो भाव जार उपकारात्मक अथवा स्वार्थपूर्ण असेल टार त्याबद्दल तिताकिशी जवालिक मनात रहात नाही. कर्वेसरांचे हे पुस्तक तैयार करताना मला जाणवले की त्यांनी अत्यंत प्रेमाने, निस्वार्थी भावनेने, गरज पडेल तेंव्हा पदरमोड करूनही आणि प्रत्येकाच्या प्रगतीला पूरक असे विचार मनात बाळगले आणि तेच कृतिताही आणले. हे तेंव्हाच होउ शकते जेव्हा माणूस सच्चा असतो. शिक्षकाची शिश्याशी नाळ जुळायलाशिवाय विचारांचे संक्रमण होत नाही. शिक्षक-शिष्य या नात्यात 'शिक्षा' म्हणजे शिक्षित करणे हां मूलमंत्र आहे, मग ती प्रत्यक्ष शिकावान्यातुं असो वा नजरेच्या जराबेतुं! त्यानी प्रत्येकालाच 'शिक्षित केले' म्हणजेच त्यांचे विचार समोरच्यापर्यंत पोहोचतील याची पूर्ण दक्षता घेतली. त्यांचे ते विचारही समाजाभिमुख व सन्मार्गावर नेणारे असल्यामुळे आज त्यांचे हजारो विद्यार्थी दृढ़ निश्चयाने मार्गकरमणा करताहेत व कर्वेसरांच्या पाउलखुणा आपापल्या परीने उमटवून विविध दिशांनी पुढे नेताहेत; आणि यातच कर्वेसरांचे यश आहे. माणसाला अंत असू शकतॊ पण विचारांना नाही. तेंव्हा कर्वेसरांचे सद् विचार, सत्कार्य व नैतीकतेचे शिक्षण असेच निरंतर समाजमनात टिकून राहो व त्याचा सुगंध प्रत्येकाला शिक्षित व प्रेरित करूँ अनंत कालपर्यंत दरवळत राहो, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना!
-
Ek Hoti Aaji (एक होती आजी)
कोकणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिचित्रे साकार करण्यात ख्यातकीर्त असलेले महान कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ही कादंबरी. आजीचे लग्न तिच्या पंधराव्या वर्षी, तिच्याहून पस्तीस वर्षांनी वयाने मोठया असलेल्या बिजरावाशी होते. तेव्हापासून तिला, नातवंडे, पणतवंडे होईतोपर्यंतच नव्हे तर ती अखेरचा श्वास घेईतोपर्यंतचा आजीचा अवघा जीवनपट या कादंबरीत उलगडून दाखविलेला आहे. ती प्रेमळ, परोपकारी, निःस्वार्थी, निःपक्षपाती होती, हे तर खरेच. या तिच्या स्नेहार्द स्वभावामुळे ती सर्वांच्या सदैव स्मरणात कशी राहिली याचे अनेक चित्ताकर्षक घरेलू प्रसंग लेखकाने नवरा, दीर, भाऊ, भावजय, दिराची मुले, सुना, जावई आदी नातेसंबंधांभोवती मोठ्या तन्मयतेने गुफलेले आहेत. तरीसुद्धा मनात प्रश्न येतोच आजी कशी होती-? लग्नापूर्वी ओढवलेल्या `त्या’ प्रसंगामुळे आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तर्हने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `ते’ अमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध प्रत्येक वाचकाला घ्यावासा वाटेल-
-
Vishayantar (विषयांतर )
...वास्तव सलगपणे बघू नं शकाणं किंवा अनुभवाची एकसंधाता न साधू शकाणं हेच महानगरी लेखकाचं वास्तव आहे. खोत त्याचाशी प्रमाणिक राहिले आहेत आणि सतत अनुभवांचा गुंतवळा मांडत राहण्याचा प्रयत्न करत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कादंबर्यांत कथानप्रधानतेला पूर्णपणे फाटा आहे... त्या वास्तावाशिच नाळ ठेवून आहेत. पण त्यातली असंगतता, अतार्क्यता जशी आहे तशी स्विकारातात... त्या कुठलाही पवित्रा घेत नाहीत. उलट पवित्रा घेणार्यांशीच दावा मांडतात. त्यांचं अंत:सूत्र पक्कं असलं तरी वरकरणी तय विस्कळीतपणे व्यक्त होतात. हा विस्कळीतपणे एका गरजेतूनच येतो. अनेकदा कथेचा मुख्या प्रवाह सोडून ते असंबन्ध गोष्टीत घुसतात. कुठल्यातरी पूर्वीच्या आठवणींचे किस्से, कोणाचे तरी विनोद, दृष्टांत कथा, सुभाषितवजा वाक्यं, कवितांच्या ओली असे तुकडे अधुनमधुन पेरत रहातात. मूळ गोष्टीशी तादात्म्य होऊ डेट नाहीत. 'विषयांतर' मध्ये तर गोष्टही नाही, नुसतेच मुद्दे आहेत... जणू एक अनुभांचं अराजक खोत निर्माण करतात. त्यामुळे आधुनिकतावाद्यांच्या कालात लेखन करणारे खोत मला उत्ताराधुनिकतावादी वाटतात. खोत गिरणगावातले. मीही गिरणगावातलाच. त्यामुळे त्यांच्याविषयी मला आदर आणि आत्मीयता तर आहेच, पण इतका महत्वाचा लेखक आपल्या अवतीभवती होता, जी हवा मी छातीत भरुन घेतली तीच हवा त्यांचाही फुफ्फुसांतुन वाहत होती आणि आम्हा दोघांच्या दिक्यावर एकच आसंमत छत्री धरून होता याचं अप्रूप माला आहे आणि ते कायम वाटत राहणार आहे.