-
Janhavi Teeri (जान्हवी तीरी )
जय मंदाकिनी उत्तर रंगे दक्षिणी गोदावरी माने! सुजलाम् सुफलाम् भूमि कराया अवतारालिस येथे! जान्हवी नदीच्या तीरी घडत गेलेली निझामी अत्याचारांविरुध्दच्या संघर्षापासून ते आधुनिक युगातील आव्हानांना सामर्थ्यपाने तोंडं देणार्या साध्या पण असमान्यत्व सिध्ह करणार्या एका छोट्या गावातील सामान्य माणसांची ही कहाणी...
-
Kimayagar (किमयागार)
सामान्य माणसातील असमान्यत्व त्यांचे जमिनीवर रोवलेले पाय कुठल्याही परिस्थितीत मुळांन पासून फारकत न घेण्याची वृत्ती अदम्य जीजीविषा मनात सतत झंकारत असलेली नि:स्पृहतेची तार निरंतर 'एकला चलो रे' चे अभियान आणि खांद्यावर निरंतर समाजिक जाणिवेच्या बांधलीकीची चिरंजीव पताका हीच या पुस्तकातील 'किमयागारां' ची किमयागारी आहे. यांच्या बाबतीत सांगयाचं तर एवढचं सांगता येईल. ये तो अकेले हि चले थे जानीबें मंजिल मगर लोग मिलते गये, कारवां बनत गया// मला विश्वास आहे, त्यांच्या हे जीवनातील सारतत्व आपल्याला या पुस्तकाच्या शब्द चिंतनातून सतत जाणवत राहील.
-
Vibhram (विभ्रम)
व्यक्तिमत्वाप्रमाणं ज्या-त्या लेखकांचे रंग ललितलेखनामधे आपोआपच मिसळले जातात; आणि हे गहिरं, अधिक पारदर्शक होत राहतं. त्या लेखनाची मंडनरचना (desing) घडत रहते. ललितलेखनाला जीवनानुरूप कथनशैलीचा नि विषयमांडणीचा एक वर लाभलेला आहे. वीणा देव ह्यांच्या 'विभ्रम' मधील लेखान्विशायांकडे पहिलं की ह्या गोष्टीची प्रचिती येते. अनुभवाची तीव्रता कमी आणि आविर्भाव किंवा अभिनिवेश अधिक असं लेखन कधीच कसदार किंवा परिणामकारक ठरत नाही. अनुभवाला त्याची म्हणून काही धार किंवा तीक्ष्णता नसेल तर ते लेखन बेगडी ठरतं. वीणा देव ह्यांनी ह्या संग्रहासाठी निवडलेल्या अनुभवांना रसरूपगंधाचा काही अनोखा स्पर्श जात्याच प्राप्त झाला आहे. पण अनुभव कितीही श्रेष्ठ वा आगळावेगळा, दिपवून टाकणारा असला, तरी तो मांडण्याचं लेखकाचं कौशल्या वा हातोटी शिल्लक राहातेच. एरवी 'अनवट'रागांतल्या चीजांसारखं अप्रचलित रूपबंधाचं ललितलेखनही कधीकधी आस्वाद्य ठरतं ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे आणि कथनशैलीमुळे.
-
Manasi (मानसी )
१९८० च्या दशकात जोमाने विस्तारु लागलेली औद्योगिक साम्राज्यं... शिवाय नव्याने उभारू लागलेले कारखाने...त्यामुळे व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली.हे ओलखून डॉ.देवबागकर मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरु करतात. एकीकडे सर्व सुखयोगिनी समृद्ध असलेल्या भागत, भरगच्च फी घेउन उच्चभ्रू वर्गासाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चालणारे देवबागकर तर दुसरीकडे आडगावात राहून दुर्लक्षित पण अत्यावश्यक असे प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक सिक्षनाचे आव्हान पेल्नरी द्वारका... कर्तृत्ववान देवबागकरांना उतारवयात पंचविशीच्या गिरिजाबद्दल वाटणारे आकर्षक आणि विवाहित असल्याचे माहित असूनही त्यांच्या मोहत पदानारी गिरिजा... द्वारका आणि देवबागकर या दोन विरुद्ध व्यक्तिमत्वामाधाला टकराव... सार्याच व्यक्ति प्रगल्भ आणि कर्तृत्ववान... त्यांचा परस्पर्विरुध रंगांमधे विणलेला गोफ...'ज्यांच त्यांच आभाळ'!
-
Mahatma Gandhi Aani Bhartiya Rajyaghatna (महात्मा
महात्मा गांधीनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वतंत्रपूर्व काळात राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनामद्धे समंत झालेल्या अनेक ठरवांमध्ये गांधीजीच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वतंत्र मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरनिशी फारशी सुसंगत आहे. असे म्हणता येत नाही. असे का झाले. असावे? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मुलभुत मतभेद का असावे? महात्मा गांधी आणि वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्ये मुलभुत मतभेद का होते? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती? आशा विविध प्रश्नाची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या इतिहासही उलगडून दाखवणारे एका जेष्ट न्यायविदाचे हे पुस्तक.... गांधीजींच्या व्यक्तमत्वाचे एका आगळ्या पैलुवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच. पण काही मुलभुत राष्ट्रिय प्रश्नाची पुनर्विचार करण्यास वाचाकांना प्रवृतही करते.
-
Mothe Lok Chote Hote Tevha
`नोबेल पुरस्कारप्राप्त बंगाली कवी-लेखक रवींद्रनाथ टागोर, चित्रकार पिकासो, शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, आल्बर्ट आइन्स्टाइन, चार्ल्स डार्विन, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, स्वामी विवेकानंद, युरी गागारीन, मार्क ट्वेन, पं. जवाहरलाल नेहरू, नेपोलिअन, कार्ल मार्क्स, स्वा. सावरकर, मार्टिन ल्यूथर किंग, म. धोंडो केशव कर्वे, नेताजी सुभाषचंद्र बोस, लिओ टॉलस्टॉय, राजा राममोहन रॉय, जॉर्ज बर्नार्ड शॉ, हेलन केलर, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार्ली चॅप्लिन, रामकृष्ण परमहंस... या जगद्विख्यात व्यक्तींच्या थोरत्वाच्या चाहूलखुणा बालपणीच्याच पाऊलवाटेवर उमटू लागल्या. सर्व शक्तिनिशी ते धडपडले, अनेक आघात सहन केले, संघर्ष झेलला, गरिबी सोसली, अथक जिद्दीने, ध्यासाने, ध्येयपूर्तीसाठी त्यांनी जिवाचे रान केले आणि ज्ञानाचा समुद्र पिऊन टाकण्यासाठी ते आतुर झाले. आदर्श नाहीसे होत चाललेल्या आजच्या काळात छोट्यांना ही व्यक्तिचित्रे मानसिक ताकद देतील.
-
Ekala Bolo Re (एकला बोलो रे)
रंगमंचावरून प्रेक्षकांशी थेट किस्सेवजा संवाद साधताना आपल्या प्रयोगाची गती, चलती फजिती आणि टवाळीही मनमोकळेपणी मांडणारे पुस्तक.
-
Yedyachi Jatra (येडयाची जत्रा)
गावगाडा बदलला तरी माणसांचे स्वभाव बदललेले नाहीत. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, प्रसंगातून सहजपणे विनोदनिर्मिती होत असते. तेच विनोद कथांमध्ये सोपान खुडे यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. मनावरचा तान आणि शरीराचा शीण कमी करण्यासाठी हा कथासंग्रह आपण सर्वानी वाचलाच पाहिजे.
-
Alamgir (आलमगीर)
'' तुम्ही, गिरफ्तारित टाकुन, आमचा छळ सुरु केला. तरीही आपला बाप - बेटे का रिश्ता तुटणार नाही. तुमच्या अम्मीजान या दुनियेतून जाताना, आमच्या हाती देऊन पालन करण्याची, जिम्मेदारी सोपवली. तेव्हा पासून परवरिश करून तुमचे खुप लाड- प्यार केले. परंतु तुम्ही सगळ विसरून गेलात. आपल्या सख्या भावना नष्ट करून, आम्हास या लाल किल्ल्यात बंदिस्त केलंत खरोखरच आम्ही नालायक, डरपोक आहोत. म्हणुनच कुजात पडलोय. तुमच्या सारख्या पुत्राचा वालिद झाल्याबद्दल, आम्हास फार फार शरम वाटते. तुम्ही करीत असलेल्या हा छळ म्हातारपणाचा आहे. तुम्हालाही आमच्यासारख्या बुढ़ापा प्राप्त होणार आहे. हे ध्यानी ठेवा.''