-
Netbhet
सामान्यपणे सर्वांनाच कम्प्युटर बद्दल खूप शंका असतात. 'व्हायरस म्हणजे काय?', 'माझा कॉम्प्युटर इतका स्लो का झाला?' किंवा 'चांगला पासवर्ड कुठला?' इत्यादी. 'नेटभेट'मध्ये 'व्हायरस पुराण', 'बॅकअप घ्या.. ..प्लीज!', 'पासवर्डच नापास', 'फायरवॉल', 'मराठी सॉफ्टवेअर कुठले वापरावे' वा 'मशीन पळवा फास्ट' यांसारख्या लेखांमध्ये तुम्हाला तुमच्या या आणि इतरही बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. आपणा सर्वाना आपण नेहमीच वापरत असलेले वर्ड प्रोसिसिंग, स्प्रेडशीट, ब्राऊ जर किंवा मेसेन्जर सारखे प्रोग्राम्स माहीत असतात. पण 'नेटभेट' आपली ओळख 'नेटवरची वंशावळ', 'मिबो', 'टास्कबार' अशा काही आगळ्याच गोष्टींशी करुन देते.
-
Hrudyarog Aani Aapan ( हृदयरोग आणि आपण )
ह्रदयविकारासंदर्भात अथपासून - इतिपर्यंत असे या पुस्तकाचे सार्थ वर्णन करता येईल. हार्ट अटॅक आल्यावर पहिल्यांदा ताबडतोब काय करावे, अचानक ह्रदय बंद पडल्यास ( कार्डिऍक अरेस्ट) कोणती पावलं उचलावीत, ह्रदयविकार असणाऱ्यांचा आहार, व्यायाम, इतकच नाही तर इसीजी, इको टेस्ट, कलर डॉपलर, अँजिओप्लास्टी, बायपास यासारख्या तांत्रिक गोष्टी अतिशय सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. ह्रदयविकारावरील इतक्या सांगोपाग पद्धतीने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक म्हणावे लागेल. हे पुस्तक ह्रदयविकारासंदर्भातील आपले अनेक गैरसमज दूर करते, आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती देते. शिवाय प्रतिबंधक स्वरूपाचे कार्यही करते. एका निरामय, सुदृढ, आनंदी जीवनासाठी हे पुस्तक म्हणजे मार्गदर्शक आहे.