-
Swapnatil Chandane
जेमतेम विशीचे असताना रत्नाकर मतकरींनी पहिली परिकथा लिहिली : "सोनेरी मनाची परी' अर्थातच, ती प्रेमकथा होती. एका तरुणानं, सगळ्या तरुणांसाठी लिहिलेली. त्या पाठोपाठ आल्या, या संग्रहातल्या इतर परिकथा- खरं तर प्रेमकथा. त्यांची कथनशौली अगदीच वेगळी. भाषा लयबद्ध, नादमधुर. इतकी चित्रदर्शी, की जसा एखाद्या गतीमान चित्रपटच आपल्या नजरेसमोर उलगडतोय. कुठं कुठं तर, छायाचित्रण केलेलं असावं तस, छायाप्रकाश आणि आकृती यांचे खेळ दिसतात. ही किमया मतकरींच्या शब्दांची. परीकथा केवळ मुलांसाठी नसतात. जे मनानं तरुण आहेत, ज्यांना जीवनातलं काव्य जाणवतं, सौंदर्याचा शोध घ्यावासा वाटतो, सुखदु:खाच्या सर्व छटांमध्ये रंगावंसं वाटतं, त्या प्रौढांसाठी, या जणू कथारूपानं सांगितलेल्या कविता आहेत. प्रेमाविषयीच्या. प्रेमातला अत्युत्कट आनंद, विरहाच्या असह्य वेदना, यांच्याही पलीकडे जाऊन, प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल, अशा सर्वच प्रेमरंगांची गाथा आहे ही. आज, काल किंवा उद्या, प्रेमात पडणार्या प्रत्येकानं वाचलीच पाहिजे, अशी या शौलीतल्या, या एवड्याच कथा मतकरींनी लिहिल्या, आणि साचा मोडून टाकला. त्यांच्या एकूण लिखाणात असा दुसरा संग्रह नाही. एकूण मराठी वाङमयातच एकमेवाद्वितीय असा हा कथासंग्रह.
-
Wasted
मार्क जॉन्सनच्या बापाच्या डाव्या हातावर प्रेम हा शब्द गोंदवलेला होता; पण त्यामुळे मुलांना बसणारा मार कधी थांबला नाही. जॉन्सनच्या घरातील मुलं शाळेत यायची, ती मार खाऊन, अंगावर माराचे वळ घेऊन; परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याचा तपास करण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. मार्क त्या फटीमधून खाली घसरला आणि कित्येक वर्षे त्याची अधोगती होत राहिली. ज्या घरात हिंसा आहे, काही दुष्ट गुपितं आहेत, अशा ठिकाणी तो वाढला. लहान वयातच त्याला वाईट सवयी लागल्या. शाळेत त्याचं बस्तान बसलंच नाही. सहा वर्षांचा असताना तो चो-या करूलागला आणि आठव्या वर्षी तो दारूपिऊ लागला. अकराव्या वर्षी त्यानं हेरॉईनची चव चाखली. एक भावनाशील बुद्धिमान मुलगा, पण त्याला योग्य वळण लागलं नाही. जरी आर्ट्स कॉलेज त्याला खुणावत होतं, तरी तो त्या ऐवजी पोर्टलँडच्या तुरुंगात गेला. त्याच्या सरळपणामुळे मादक द्रव्यांचे सेवन आणि गुन्हे यांच्या गर्तेत मार्कची कशी अवनती झाली, याचं अत्यंत प्रामाणिकपणे लिखाण वेस्टेडमध्ये झालं आहे. हेरॉईन आणि क्रॅकचं सेवन, लंडनच्या रस्त्यावर बेघर राहणं, त्याला ठार मारण्यासाठी दिलं जाणारं बक्षीस, या अशा परिस्थितीत कुणीही - स्वत: मार्कही आपण जिवंत राहू, अशी आशा करत नहता. बरं होणं तर दूरच राहिलं, पण एवढं असून यातून बाहेर पडण्याची शक्ती त्याला मिळाली आणि आता तो आपला 'झाडांची शल्यचिकित्सा' हा व्यवसाय जोमात चालवत आहे आणि इतर अशा जंकीजना नोकरीला ठेवून या मादक द्रव्यसेवनातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. त्याची ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.
-
Samanyatil Asamanya (सामान्यांतले असामान्य)
सुधा मूर्ती यांचे नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्ठ्यपूर्ण पुस्तक मराठीत! यातील सर्व व्यक्ती उत्तर कर्नाटकातल्या आहेत. त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तसेच ते सगळे इथल्या वौशिष्ट्यपूर्ण संस्कृती[...]
-
Manasi
काय दिलं माझ्या प्रेमानं ? फक्त दु:ख... ? ऑसमंडच्या गाण्याचा मुखडा आहे बघ, 'लव्ह इज ओन्ली फॉर टुडे'. प्रेम फक्त आजच्यापुरतंच, या क्षणापुरतंच असतं. ते आज जगून घे. हे खरं असावं, पण कळलं कधी नाही. माणसाच्या मनाचीच नाती खरी, हे गृहीतक होतं माझं. प्रेमाबरोबर मीही एक नातं विणायला घेतलं. सामाजिक नात्याला झुगारून... तरीही सामाजिक होतंच ते... मग लक्षात आलं, की माणसाच्या मनाच्या नात्याला तर स्थानच नाहीये आणि किंमतही. सत्य हे की, सामाजिक नात्यांचा शिक्का खोलवर रुतून बसलाय आपल्या मानसिकतेत. एखाद्या गुणसूत्रासारखा रुजलाय आपल्यात.
-
Champion Va!
छोट्या दोस्तांनो, 'चॅम्पियन' व्हायचंय ? मग खास तुमच्यासाठी आहे, पंचतंत्र, नव्हे पंचसूत्र ! प्रथितयश लेखिका डॉ. रमा मराठे यांच्या सिद्धहस्त लेखणीचा नवा आविष्कार! तुम्हाला समजेल अशा सहज-सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टीरूप खजिना... अभ्यास, आरोग्य, आत्मविकास, संस्कार, सामाजिक बांधीलकी ही पंचसूत्री करा आत्मसात आणि... गुणवंत व्हा ! यशवंत व्हा ! जयवंत व्हा ! सुखानं राज्य करा !