-
Kramashaha
खानावळीत राहाणारा, सायकल वापरणारा आणि मनातल्या मनात सतत काही लिहीत राहणारा कुणी एक बाबू असतो आणि त्याचे खानावळीचे बील थकते म्हणून त्या खानावळवाल्यानेच चालवलेल्या एका पाक्षिकात क्रमश: एक कादंबरी लिहीत लिहीत तो ते बील भागवतो. तर ही क्रमश: कादंबरी लिहिणे आणि त्याची प्रक्रिया उलगडणारे त्या नायकाचे प्रथमपुरुषी निवेदन, त्या कादंबरीला येणारी नमुनेदार प्रतिक्रियात्मक पत्रे, त्या क्रमश: कादंबरीतील काही पात्रांच्या चर्चा असे या कादंबरीचे काहीसे गुंतागुंतीचे स्वरूप आहे. वास्तवातले वास्तव आणि साहित्यकृतीमधले वास्तव यातली सरमिसळ करण्याचे प्रयोगही आहेत. सुरुवातीला चक्रावून टाकणारी, नंतर गुंतवून टाकणारी आणि शेवटी अस्वस्थ करणारी अशी ही कादंबरी आहे. प्रभावी आणि प्रयोगशील असणारे केळुसकरांचे कादंबरीलेखन दाट आशयाने आणि चिंतनशीलतेने उत्तरोत्तर अधिक समर्थ होत जावे.
-
Antarbahya (अंतर्बाह्य )
मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणारया रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथांचा ताजा संग्रह. भीतीच्या विविध स्वरूपांमधून मानवी मनाचे अथांग व्यापार शोधणाऱ्या आणि म्हणूनच मराठी कथा साहित्यात आढळपद मिळवणाऱ्या रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथांचा ताजा संग्रह .
-
-
Andharvari
प्रेम, दु:खं, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तींत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. या कथा अशा बदललेल्या बाजाच्या आहेत. सालंकृत भाषाशैली आणि अनोखे कथाविषय यांनी समृद्ध झालेल्या या संग्रहातील कथा एक वेगळीच उंची गाठतात. अशा कथा कधी वाचल्याच नव्हत्या असं वाटायला लावणारी, मानवी मनाच्या असंख्य काळ्याकपारींचं अज्ञात दर्शन घडविणारी, ही अंधारवारी.
-
Ek Dhaga Sutacha
ते दिवस... संघर्षाचे होते अन् मंतरलेलेही ! स्वातंत्र्यानंतर देश, राजकारण सगळेच बदलेले. आम्हांला घडवणारी पिढी काळाच्या पोटात गडप झाली. उरता उरल्या माझ्यासारख्या काही.... या भरलेल्या दिवसांना उजाळा देणा-या... पराकोटीचा संघर्ष, ध्येयवादाची पदोपदी घेतली गेलेली परीक्षा आणि देशसेवेची आंतरिक उर्मी यांनी भरलेली ही जीविका. स्वातंत्र्याचा सुर्य आणि सहस्त्रचंद्र पाहणा-या या वाटचालीतील एक 'आई' देखील भेटते आणि मन स्तिमित होते... ही आई आहे, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर या सुपुत्राची!