-
Prematun Premakade (प्रेमातून प्रेमाकडे)
मैत्री, प्रेम यावर जग जगात असते. मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण मैत्रीलाही काही वेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री - पुरूषांमधील असेल तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबधातील मैत्र अरुणा ढेरे यांनी 'प्रेमातून प्रेमाकडे ' मधून वाचकांपुढे उलगडले आहे. मार्गारेट नोबेलने विवेकानंद यांना प्रथम पहिले तेव्हाच त्यांना जीवन समर्पण करण्याच्या निश्चय केला. स्वामींनी समाजकार्यासाठी निवेदिताच्या रुपात तिला शिष्यत्व बहाल केले. निवेदिता व गोपाळ कृष्ण गोखले यांचे सौहार्दाचे मित्रत्व, गोखले व सरोजिनी नायडू यांचे स्नेहसंबंध, 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला स्वररचना देणाऱ्या व महात्मा गांधी यांची अधार्मिक प्रेरणा बनलेल्या सरलादेवी घोषाल, ब्रिटनमधील मेडेलिन स्लेड उर्फ मीरा बेन हिची गांधीजींवरील उत्कट प्रेमभक्ती, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून व्यक्त झालेली अॅना उर्फ नलिनी तसेच त्यांची वहिनी कादंबरी, रवींद्रनाथांसाठी काहीही करण्यास तयार असणारी व्हिक्टोरिया ओकॅम्पो, सुभाषचंद्र बोस व एमिली यांचा विवाह, सेनापती बापट व त्यांची रशियन मैत्रीण अना, डॉ. आंबेडकर व फॅनी यांच्यातील नाते, यावर यात प्रकाश टाकला आहे.
-
Madhu Mangesh Karnik: Vyaktimattva Aani Vangmain K
मधु मंगेश कर्णिक हे मराठीतील एक सव्यसाची साहित्यिक आहेत. गेल्या पन्नास वर्षांत सहाशेहून अधिक कथा, ‘देवकी’, ‘माहीमची खाडी’, ‘भाकरी आणि ङ्गूल’, ‘सनद’, ‘जुईली’, ‘वारूळ’, ‘संधिकाल’ इत्यादी दहा कादंबर्या, आठ ललित लेखसंग्रह, तीन व्यक्तिचित्रसंग्रह इत्यादी विविधांगी साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. तीन नाटक, बालसाहित्य, कविता, संपादने अशाही स्वरूपाच्या निर्मितीचा समावेश होतो. ‘जैतापूरची बत्ती’ हे त्यांचे अगदी अलीकडचे पुस्तक त्यांच्या कोकणप्रेमातून निर्माण झाले आहे. त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व हे कोकण या जन्मभूमीशी तसेच मुंबई या महानगरीशी अंतर्बाह्य स्वरूपात संबंधित आहे. नवनव्या विषयांचा कुतूहलपूर्ण वेध घेणारे, बहुविध जीवनानुभवांचे सहानुभूतिपूर्ण चित्रण करणारे, मानवतावादी भूमिकेतून दु:खाशी सहकंप पावणारी साहित्यनिर्मिती करणारे, भावनांना आवाहन करणारे तरीही विचारांना प्रेरणा देणारे, माणसाच्या अध:पतनाचा आणि सामाजिक-सांस्कृतिक मूल्यर्हासाचा आलेख रेखाटणारे, सुगम, आवाहक साहित्यनिर्मिती करणारे लेखक म्हणून मधु मंगेश कर्णिकांचे मराठी साहित्यातील स्थान अढळ आहे. मधु मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्त्व आणि वाङ्मयीन कर्तृत्व या ग्रंथात डॉ. महेश खरात यांनी कर्णिक यांच्या समग्र वाङ्मयाचा सूक्ष्म वेध घेतला आहे. कर्णिकांच्या लेखनाचे बहुविध विशेष या ग्रंथामधून त्यांनी सप्रमाण विशद केले आहेत. त्यामुळे मधु मंगेशांच्या व्यक्तिमत्त्वावर व कार्यकर्तृत्वावर चांगला प्रकाश पडला आहे. गेवराई येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहात असलेल्या डॉ. महेश खरात यांच्या प्रस्तुत ग्रंथामुळे कर्णिकांविषयीच्या साहित्यसमीक्षेत मोलाची भर पडली आहे. -विलास खोले
-
Shalana Lihileli Patre (शाळांना लिहिलेली पत्रे)
जे कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना पाठविलेल्या पत्रांचे हे संकलन आहे. 'कृष्णमूर्ती ह्या पत्रांमधून - निव्वळ पदवीलाच महत्त्व न देता विद्यार्थ्यांचा परिपू्र्ण विकास साधून त्यांना मानवी जीवनाची मौलिकता आणि प्रतिष्ठा ह्या गोष्टींची जाणीव करुन देणे, केवळ ऐहिक प्रगतीवरतच लक्ष केंद्रित न करता त्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टीचा वेध घेण्यासाठी आणि वैश्विक समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना तयार करणे ह्या बाबतीत शिक्षणपद्धतीला आलेल्या अपयशाकडे आपले लक्ष वेधतात. ही पत्रे वाचताना पालक, शिक्षक, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आणि शिक्षणाविषयी आस्था वाटणा-या अन्य व्यक्तींच्याही जाणिवा समृद्ध होतील.
-
Tatvadnyani Dr.Babasaheb Ambedkar (तत्वज्ञानी डॉ.
यशवंत मनोहर यांनी 'तत्त्वज्ञानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकात बाबासाहेबांचे विश्वपुनर्रचनेचे तत्त्वज्ञान अधोरेखित केले आहे.
-