- 
                                    
Chakravyuh Bhed ( चक्रव्युह भेद)
एक म्हातारा त्याच्या नातीसह हॉटेल रंभामध्ये एक आठव्द्याकरिता उत्तरला.वीस वयाच्या त्या सुंदर, देखण्या नातीचा तो साठीतील म्हातारा होता. दोघं अगदी मौज माजात राहत होते. म्हातारा रंगीन शौकीन वागत होता. इष्क, मोहबत्तीची गाणी गुणगुणायचा, भरघोस सेंट मारून हॉटेलभर फिरायचा, भडक चित्रांची मासिकं बकोटीला मारून हिंडायचा. एकंदरीत त्याचं ते वागणं पाहून हॉटेलवाल्यांना काही वेगळाच संशय येत राहिला. तिसरया मध्यरात्री हॉटेलवर पोलिसांची रेड पडली आणि दोघं पोलीस म्हातारयाच्या दारावर जोरजोरात दंडूका आपटू लागले. हॉटेलमधील दिवेही मालविण्यात आले. म्हतारयाने दार उघडले आणि तो चार बोटी हात दरवाज्याच्या फटीतून त्यानं पाहिला. "ए म्हातारया, या वयात हे धंदे?" सोबतचा हवालदार म्हणाला. "आम्हाला सगळी खबर असते." "याला समोरच्या खोलीत डांबून ठेव. मी बघतो या धंदेवालीकडे!" त्या तरुणीकडे आशाळभूतपणे पाहत तो गॉगलधारी म्हणाला . "इन्स्पेक्टर पाटणकर, तुझा खेळ संपलाय." ताठ उठून उभा राहात म्हातारयाच्या वेषातला मियां म्हणाला. "नाही!" पाठीमागून राजहंसचा अवाज घुमला." हा इन्स्पेक्टर पाटणकर नाही. हा त्याचा तोतया. इन्स्पेक्टर रानडे गिरफ्तार करा याला."
 - 
                                    
Har Har Mahadev (हर हर महादेव)
भारतात फार मोठया प्रमाणात घातपात घडवून आणायची पाकिस्तानची जी योजनेची ही सुरुवात होती. सुरुवात तर झाली होती. पण पुढं काय हा प्रश्न अनुत्तरित होता. अर्थात काळाकडं याचं उत्तर होतं. इतिहास याची साक्ष होता. महाराष्ट्रात शिवछत्रपतीनी निर्मिलेल्या या हिंदवी स्वराज्यात जेव्हा जेव्हा असली पाशवी कृत्ये घडली आहेत तेव्हा एकच आवाज आला आहे. "हर हर महादेव ….!"
 - 
                                    
Savtya (सावटया)
त्या रात्री मी खोलीत एकटाच होतो. दाराला बाहेरून कुलूप होतं. दाराला एक लहान खिडकी होती. खिडकीला तारांची काच होती. त्या काचेच्या चौकोनावर माझं लक्ष होतं. डॉक्टर त्यांच्या रात्रीच्या राउंडवर येण्याची मी वाट पहात होतो. त्याचवेळी माझ्या डोक्यात अगदी मागे एक कलकल सुरु झाली. एखाद्या भुंग्याने लाकूड पोखरावं, तसं काहीतरी माझा मेंदू पोखरत होतं. एखादं गिरमिट फिरावं तसं ते गरगरत होतं, लांब जात होतं, परत जवळ येत होतं… आधी मला वाटलं हा त्या 'सावटया' चाच खेळ आहे..