-
Vidnyan Visharada (विज्ञान विशारदा)
कमला सोहोनी यांनी सारं आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवलं. अनेक जागतिक राष्ट्रीय मानसन्मान मिळवले. उत्तरायुष्यात ग्राहक चळवळीचं व्रत हाती घेतलं. आपल्या वैज्ञानिक बुद्धीनं काही नवे उपक्रम आणले. त्यांच्या आठवणींच्या आधारे साकारलेली त्यांची ही चरित्रकहाणी...
-
Baindarche Divas ( बाइंडरचे दिवस)
सखाराम बाईंडर हे नाटक रंगभूमीवर आलं आणि बर्याच कारणांनी गाजलं. सामाजिक प्रक्षोभ, कोर्टकचेर्यांना तोंड द्यावे लागताना दिग्दर्शक म्हणून कमलाकर सारंग यांना आलेले हे अनुभव.
-
Mansavi (मनस्वी)
बाबुराव चंदावर यांचे आत्मकथन भारताच्या राजकीय इतिहासातील अत्यंत रोमहर्षक कालखंड आहे. आचार्य विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण तसेच जेपी आणि इंदिरा गांधी यांच्यातील व्यक्तीसंबंधांवर अधिकारवाणीने लिहिणारे बाबूराव हे एकमेव म्हणावे लागतील. बालवयात रागावून घर सोडले आणि बाबूराव सार्वजनिक कार्यात खेचले गेले. या प्रवासात उत्तुंग उंचीचे अनेक मार्गदर्शक भेटले आणि त्यांच्या छायेत बाबुरावांची प्रगती होत गेली. कधी आपल्या तत्वाबरोबर तडजोड करण्यास नकार देणारे बाबूराव, विनोबा आणि जेपी यांना सारखेच प्रिय होते. आपले अंतकरण दोघेही बाबूरावांसमोर खुले करत असत. 'आनंदवन' चे प्रेणेते बाबा आमटे यांच्याकडून स्थानिक गावकरयांनवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या बाजूने बाबुराव ठामपणे उभे राहिले. शासकीय यंत्रणा आणि सर्वोदयातील ज्येष्ठ मंडळींचा दबाव त्यांनी झुगारून दिला. अखेर बाबांनी तडजोडीला मान्यता दिली आणि गावकरयांना न्याय मिळाला. आणीबाणीच्या काळात विनोबा भावे यांचे एक-दोन निर्णय आवडले नाहीत म्हणून त्यांच्यावरही आक्षेप घेताना बाबूराव कचरले नाहीत. जेपी अमृतकोषाच्या संदर्भातही त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. गुरुजनांनी सांगितलेल्या तत्वानुसारच बाबुरावांनी मार्गक्रमणा केली. प्रसंगी त्यांनी तत्वाचा आग्रह धरताना गुरुजनांचेही ऐकले नाही. म्हणून 'मनस्वी' हा शब्दात त्यांच्या जीवनपटाचे सार सामवलेले आहेत. बाबुरावांचे आत्मकथन हा भारताच्या राष्ट्रीय इतिहासातील एक अमोल दस्तऐवज आहे.
-
Athvanitale Babasaheb (आठवणीतले बाबासाहेब)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात आलेल्या नऊ व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी. त्यांधून बाबासाहेबांचे एक आगळेवेगळे दर्शन होते.
-
-
Hrudayastha (हृदयस्थ)
हृदयस्थ’ ही कहाणी आहे नितू मांडके या बिनधास्त, महत्त्वाकांक्षी मराठी माणसाची. त्यांचे शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि भव्य स्वप्नं हे सारे यथार्थपणे उभे केलंय त्यांच्या सहचाणिरीने. आपल्या पतीच्या आकांक्षात विरघळून गेलेल्या, त्याच्या मृत्युचं दुःख पचवून त्याचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एकाकीपणे झटणाऱ्या डॉ. अलका मांडके यांनी या वादळासोबतच्या आपल्या सहजीवनाचा पट उलगडलाय तो मनाला न भिडला तरच नवल!
-
Jay Ho ! ( जय हो !)
जय हो! हा नारा अन्यायविरुद्ध संघर्षाचा. जय हो! न्याय्य मागण्यांचा. जय हो! जीवनातील नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा जय हो! असा नारा घुवत केलेला थाळिनाद, आखलेला लाटणीमोर्चा, केलेला घंटानाद, घातलेले घेराव, हादरवलेले मंत्रालय, भयभीत केलेले साठेबाज आणि स्वत्व निर्माण केलेला समाज... या घटना आहेत चाळीस वर्षांपूर्वीच्या. सामान्य गृहिणी, शिक्षिका, कायकर्ती, समाजकारणी आणि राजकारणी अशा क्रमाने समाजात आदराचे स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे हे आत्मकथन. संयमित तरी परखड शब्दांत उलगडणारा हा महाराष्ट्राचा गेल्या सात दशकांचा सामाजिक-राजकीय इतिहास.
-
Maharashtrachi Suvarnagatha (महाराष्ट्राची सुवर्णग
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ में १९६० रोजी झाली. त्यापूर्वीपासून आजतागायत वसंत (दादा) देशपांडे वृत्तसंकलन करत आहेत. महाराष्ट्र निर्मितीचा सोहळा, महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अधिवेशन, यशवंतराव चव्हाण यांची भाषणे, सत्ताबदल, आपत्ती व्यवस्थापन आणि संकटांचा मुकाबला अशा विविध अंगांना स्पर्श करत त्यांनी अचूक संदर्भांसह हा ग्रंथ सिद्ध केला आहे. या ग्रंथाची भाषा अथपासून इतिपर्यंत वृत्तपत्रीय आहे. हे लिखाण ललित करण्याचा मोह देशपांडे यांनी टाळला आहे. वृत्तपत्रीय लिखाणात अचूकता, नेटकेपणा आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे या तीन घटकांना सर्वाधिक महत्त्व असते. यच तंत्राचा अवलंब देशपांडे यांनी केला आहे.
-
Saitanachi Khushi (सैतानाची खुशी)
राकेश भडंगची कविता विचारपरिप्लुत आहे; पण विचारजड नाही. तो सार्या जगाचे प्रश्न, भावभावना समजावून घेऊ शकतो आणि थेट मानवी अस्तित्वाच्या मुद्यालाच भिडतो. बिकट तत्त्वज्ञान वाटावे अशी ही गुंतागुंत तो कवितेच्या रेषांमधून सरळ मांडत जातो. त्यामध्ये हसण्याखेळण्याची कविता आहे, स्त्रीमुक्तीची कविता आहे, इसापाचीही कविता आहे... राकेश भडंगच्या कवितांचा हा पसारा वाचून त्याच्या आधुनिक दृष्टीचा प्रत्यय येईल आणि वाचकाची समजूत प्रगल्भ होईल...
-
Moun Hoi Bolke (मौन होई बोलके)
'मूकं करोति वाचालम' हे आपण ऐकून असतो. मात्र हा केवळ दैवी चमत्कार नसतो. व्यक्ती मुकी का होते आणि तिला बोलते कसे करता येते यामागे शास्त्र असतेच; पण त्यापेक्षा असते प्रचंड मेहनत आणि माणूस म्हणून दिलेला प्रेमळ आधार. मुंबईत कर्णबधिरांसाठी शाळा काढून रोहिणी लिमये यांनी अनेकांना मुकेपणापासून मुक्ती देऊन व्यक्त होण्याची संधी उपलब्ध केली. कर्णबधिरांसाठी शाळेसह उपयुक्त कार्यक्रम आखले. श्रवण, वाचा व भाषाविष्कारासाठी विविध साधनांची निर्मिती केली. त्यांच्यातला माणूस घडवला. या अथक परिश्रमांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला. स्वत: मूक राहून, आपल्या योगदानातून बोलणाऱ्या ध्यासाची ही कहाणी.
-
Vivekvad (विवेकवाद)
विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. आज सर्व मूल्यांचा कल्लोळ होत असताना माणसाने या शक्तीचा उपयोग करण्याची गरज आहे. अशा प्रकारे केलेल्या वर्तनाचा आणि त्यामागील तत्त्वज्ञानाचा सांगोपांग विचार या पुस्तकात केलेला आहे.
-
Jag Janukanche (जग जनुकांचे)
शेकडा दोन टक्के व्यक्ती जनुकदोषांचा कसलाही पूर्वेइतिहास नसताना सव्यंग जन्मतात. हे दोष गर्भाध्ये शारीरिक व्यंगाच्या किंवा बुध्दिमांद्याच्या स्वरूपात दिसू शकतात. जनुकशास्त्रासंबंधित समस्यांबाबत थोडीशी काळजी घेतली, योग्य सल्ला मिळाला तर हे रोग निश्चित टाळता येतील. अशा इच्छेपोटी उपजलेले हे पुस्तक...
-
Sankhyadarshan (संख्यादर्शन)
संख्याशास्त्राचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. त्याचा शास्त्र म्हणून विकास झाला तो गेल्या दीड-दोन शतकांत. शेती, व्यापार, जगनणना वगैरे क्षेत्रांत संख्याशास्त्र वापरले जातेच, पण कोणत्याही विज्ञान क्षेत्रातील प्रयोगांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संख्याशास्त्र हे एकमेव साधन आहे. संगणकामुळे संख्याशास्त्रातील आकडेोड गतीने होऊ लागली आणि संगणकही या शास्त्राचा अविभाज्य घटक बनला. ही रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक.
-
Tai Mi Collector Vhayanu ! (ताई, मी कलेक्टर व्हयनू
प्रतीक्षा करणार्या आम्हा सर्वांना गेटच्या बाहेर काढण्यात आले. निकाल चार-पाच नोटीस बोर्डांवर लावल्यानंतर गेट उडण्यात आले. मोठा कोलाहल झाला व निकालासाठी ताटकळत बसलेले सर्वजण नोटीस बोर्डांवर मधमाशांसारखे जाऊन चीपकले. मी बोर्डासमोर उभ्या असलेल्या मुलांच्या कंबरांमधून जागा करून माझे मुंडके मध्ये घुसवले आणि मान वर करून तालिकेकडे बघू लागलो. तालिकेत माझे नाव बघितले तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझ्या हृदयाचे ठोके काही सेकंदांसाठी बंद झाले! तालिकेत दिसणाऱ्या माझ्या रँककवरून मला आय.ए.एस. मिळणार हे निश्चित झाले होते. जे मी अनुभवत होतो त्यावर माझा विश्वास बसत नव्हता.मी घरी आतुरतेने वाट बघत असलेल्या स्मिताला आणि नंतर माझ्या माऊलीला-ताईला-आनंदाची बातमी कळवण्यासाठी उतावीळ झाले होतो. त्यांना फोन करतोपर्यंत माझा कंठ दाटून आला होता व डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ताईने फोन उचलताच मी जोराने ओरडलो, "ताई, मी कलेक्टर व्हयनू!"
-
Lock Griffin (लॉक ग्रिफिन )
ही गोष्ट आहे एका मराठी कुटुंबाची. गोष्ट आहे तीन पिढ्यांची ,ह्याला पार्श्वभूमी आहे गेल्या बासष्ठ वर्षांतील इतिहासाची, संस्कारांची आणि घटनांची. ह्या काळात अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरे येऊन गेली. एका साधारण मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. नेहमीच्या धडपडीतही सुखानं नांदणारं हे घर. आजूबाजूच्या स्थित्यंतरांचे, कधी पुसट तर कधी गडद, पडसाद उमटत गेले. जीवनमान बदलत गेलं, आर्थिक परिस्थिती सुधारत गेली, त्याचबरोबर आजूबाजूचा गोंधळ, अस्थिरता आणि अस्वस्थता वाढतच गेली. येणार्या वादळातही, शिक्षण, संस्कार, मूल्यं यांची ओंजळ जपत इतर अनेकांसारखं हे घरही उभं होतं. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सत्ताकरणाची गुंतागुंतीची समीकरणं अनाकलनीय असली, तरी भयप्रद आहेत. एक अस्वस्थ खळबळ आहे, सारं काही हरवत चालल्याची भिती वाटते. जगभर उद्रेकाचे पडघम वाजायला लागले आहेत. एकीकडे क्रयशक्तीची भरमसाठ वाढ आहे, तर दुसरीकडे मंदीचा भस्मासूर वाकुल्या दाखवतो आहे. वादळात सापडलेल्या गलबताला दिशाहीनतेचं सावट ग्रासून टाकत आहे. १९२४ साली रत्नागिरीजवळच्या छोट्या गावात जन्माला आलेले विश्वनाथ मोरेश्वर हे पहिल्या पिढीतले, त्यांची दोन मुलं, मोठा रघुनाथ बँकेत नोकरीला, तर धाकटा धनंजय सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि एनक्रिप्शन क्षेत्रातील तज्ज्ञ. रघुनाथचा एकुलता एक मुलगा सौभद्र आणि त्याची अमेरिकन मैत्रिण ज्युलिया ही तिसरी पिढी. ६२ वर्षांचा कालखंड, अमेरिका, ब्रिटन, दिल्ली, डोंबिवली असा विस्तृत रंगमंच. एका उत्कंठावर्धक जिगसॉचे तुकडे जुळवत चित्र उभं करणारी ही कहाणी. सामान्य माणसांच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं. हे नाट्य उलगडून दाखवणारी ही गोष्ट.