-
Charles Darwin (चार्ल्स डार्विन)
डार्विन या शास्त्रज्ञाच्या आठवणीचा कोलाज असं या आत्मचरित्राच्या अनुवादाचं वर्णन करता येईल. एका थोर वैज्ञानिकाचं जगणं सर्वसामान्य जनतेसमोर त्याच्याच शब्दांतून मांडण्याचा हा अनुवादी प्रयत्न निःसंशय कौतुकास्पद आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक याविषयी आपल्या समाजातील उदासीनता दूर करण्यासाठी अशाप्रकारच्या वेधक शैलीतील लिखाणाची आज खरोखरच गरज आहे. एका वैज्ञानिकाच्या आत्मचरित्राच्या निमित्तानं वैज्ञानिकाचं अंतरंग, त्याची मानसशास्त्रीय जडणघडण, विज्ञान क्षेत्रातील त्याचा सर्जनशील प्रवास याला भिडणारं असं हे पुस्तक आहे
-
Glokal Lekhika (ग्लोकल लेखिका)
आपल्या सुशिक्षित सुसंस्कृत समाजात अजूनही जगातील साहित्याबद्दल, सांस्कृतिक वैविध्याबद्दल आणि सामाजिक जीवनशैली आणि भावविश्वाबद्दल खूप कुतूहल आहे. तितकेच किंवा त्याहूनही अधिक कुतूहल आहे लेखिका, महिला कलाकार, महिला नाटककार यांच्याबद्दल अधिक कुतूहल असण्याचे कारण गेली सुमारे दीड-दोनशे वर्षं या साहित्य- कला विश्वावर वर्चस्व आणि प्रभुत्वसुद्धा पुरुष लेखक- नाटककारांचे राहिले आहे. जगभर, अगदी भारतात, आफ्रिकेत व चीन- जापानमध्येसुद्धा. ही ' पुरुषी प्रभुत्ववादी' साहित्य चौकट संजीवनी खेर यांनी एकप्रकारे मोडली आहे. त्यातूनच हा 'ग्लोकल लेखिका' प्रकल्प त्यांनी सुदेश हिंगलासपूरकर यांच्या मदतीने सिद्धीस नेला आहे. - कुमार केतकर
-
Yoddha Karmayogi : Eknath Sambhaji Shinde (योद्धा
"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा! ... आणि इतकं करूनसुद्धा भोळेबिचारे असंही नाहीये. त्यांच्यामध्ये जेवढे राजकारणी गुण हवेत, तेवढे नक्की आहेत. सात्त्विक आहेत. एक शिस्त आहे. ती ते बरोबर पाळणार. स्वत:चं दुःख हे आपल्यापाशी मनाच्या कपाटात ठेवायचं आणि दुसऱ्याच्या सुखाचा सतत विचार करायचा. दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद व्यक्त करणं, तेही प्रामाणिकपणे, हे एकनाथरावांना जमलं आहे. हसत हसत दुःख ओलांडून पलीकडे जाण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना दिलीय. - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
-
Marathi Bhasha : Lekhan-Margadarshan (मराठी भाषा :
श्री. सलील वाघमारे हे शासनमान्य मराठी लेखनविषयक नियमांचे केवळ अभ्यासकच नाहीत, त्या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. हे या लेखांच्या स्वरूपावरूनच लक्षात येते. शिवाय, शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतकेच नव्हे तर, मराठी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांना, वृत्तपत्रांना, औपचारिक लेखन करणाऱ्यांना, शासकीय लेखन करणाऱ्यांना अशा सर्वांना निर्दोष लेखन करता यावे, या उद्देशाने सोप्या शब्दांत केलेले विवेचन हे ह्या पुस्तकातील लेखांचे वैशिष्ट्य आहे. या सर्व लेखांतून मराठीच्या विविध शब्दांचे लेखन, त्यासंदर्भात येणारे काही व्याकरणातील शब्द, सामान्य वाचकाला अपरिचित शब्द, यांचे स्पष्टीकरण श्री. वाघमारे यांनी इतक्या सोप्या, सुलभ पद्धतीने केले आहे, की त्यामुळे सर्वसामान्य मराठी भाषकांना हे पुस्तक अतिशय आवडेल, ते संग्राह्य वाटेल, इतकेच नव्हे, तर त्या पुस्तकाचे वारंवार वाचन करून मराठीच्या विविध शब्दांचे अनुकरण करावे, असे वाटेल. यास्मिन शेख (ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ)
-
Lavnaya Nakshatra (लावण्य नक्षत्र...)
लावणी आणि तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. आजवर तमाशा कलावंतांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र ही कादंबरीदेखील प्रत्येकाप्रमाणेच वेगळी आहे हे निश्चित. यात एक नायक, एक नायिका आणि त्यांचं प्रेम आहे. तसंच दोन बहिणींचं घट्ट नातं कसं असतं हे देखील यात दाखवलं आहे. मात्र तरीही ही केवळ एक प्रेमकहाणी आहे असं मी म्हणणार नाही. अर्थात असं का, ते वाचकांच्या ही कादंबरी वाचल्यानंतरच लक्षात येईल. या कहाणीमध्ये फक्त प्रेम नाहीये. तर विरहही आहे, दुःख आहे, वेदना आहेत, ताटातूट आहे. त्याच जोडीला लावणीची साधना आहे, त्याग आहे, घुंगरांचा नाद आहे, ढोलकीचा आवाज आहे, गरिबी आहे, प्रसिद्धी आहे, अन्याय आहे, विद्रोह आहे, समर्पण आहे आणि समाधानसुद्धा. म्हणूनच ही फक्त प्रेमकहाणी नसून जीवनकहाणी आहे.
-
Patanjalyogdarshan (पातंजलयोगदर्शन )
उपनिषदांचा काळापासूनच भारतीय तत्त्वचिंतकानी मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा गंभीर प्रयत्न सातत्याने केला आहे. भौतिक जगापलिकडे असलेल्या गूढ अशा सृष्टीच्या परमतत्त्वापर्यंत मानवी अस्तित्व पोहोचू शकते का? विस्तारू शकते का, याचा शोध घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे योगसाधना! याची जाणीव झाल्यावर भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा फार मोठा भाग योगसाधनेच्या अनेक मौलिक प्रणालींनी व्यापला आहे. पातंजल महाभाष्याबरोबरच योगसूत्रांचेही कर्तृत्व ज्यांच्याकडे जाते ते पतंजली इसवीसनापूर्वी सुमारे दीडशे वर्षे होऊन गेलेले महापंडित. त्यांचे योगदर्शन म्हणजे भारतीय योगविषयक तत्त्वाचिंतनाचा सर्वमान्य आणि सर्वाधिक प्रमाण मानला गेलेला ग्रंथ आहे. पूर्वाभ्यासांच्या आधारे या योगसूत्रांचे साधे आणि आकलनसुलभ असे विवेचन इथे केले आहे. साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्वांना योगशास्त्राची ओळख करून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे असे लक्षात येते. एक महत्त्वाचा योगविषयक ग्रंथ सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत यावा ही या पुस्तकामागची प्रेरणा अभिनंदनीय आहे. - डॉ. अरुणा ढेरे
-
Ladha Mumbaicha Covidshi (लढा मुंबईचा कोविडशी)
मुंबई कोरोनाशी लढली आणि लढतालढता एका वेगळ्या अर्थाने घडली. कोरोनाच्या तीन लाटा आल्या, त्या प्रत्येक लाटेतून मुंबई महापालिका काही ना काही शिकली. कधी तिने ऑक्सिजन पुरवठ्याचे धडे घेतले, कधी बेड्सच्या सोयीचे, तर कधी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे. या लढ्याचं नेतृत्व स्वीकारून महापालिकेने आपल्या सर्व विभागांतल्या कर्मचाऱ्यांची टीम उभी केली आणि ‘सगळ्यांना' बरोबर घेऊन मुंबईला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढलं. सुरेश काकाणी यांनी या पुस्तकात कोरोना व्हायरसवर मुंबईने विजय कसा मिळवला, हे बारकाईने आणि तपशीलवार मांडलं आहे. काकाणी आणि त्यांची टीम कोरोनाशी लढताना वेगवेगळ्या कल्पना मांडण्यात आणि त्या प्रत्यक्षात आणण्यातही सतत आघाडीवर होती. कोरोनाशी दिलेला हा लढा ‘मुंबई मॉडेल' म्हणून जगभर चर्चेत कसा राहिला याची माहिती यातून मिळते. त्यामुळे हे पुस्तक अस्सल आणि खिळवून ठेवणारं झालं आहे. - डॉ. सुभाष साळुंखे
-
Anandyatri Police Adhikaryachi Diary (आनंदयात्री प
पोलिस खात्यातील प्रदीर्घ सेवा आणि त्यातील आपल्या अनुभवांचे भांडार अनोख्या शैलीत मांडणारे एका आयपीएस अधिकाऱ्याचे वाचनीय आत्मकथन. प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक : 'आनंदयात्री पोलिस अधिकाऱ्याची डायरी'