-
Lalbag (लालबाग)
लालबाग! मुंबईचा एक असा सांस्कृतिक भाग, की जिथे माणसांबरोबर माणुसकीही नांदली. लालबाग-परळ-नायगाव म्हणजेच गिरणगाव हे समीकरण रूढ झालं. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे, नव्या भांडवलदारांमुळे आणि 'संपा'च्या तीक्ष्ण हत्यारामुळे गिरणीकामगारांचं झालेलं शोषण, त्यांचं ध्वस्त जगणं या सर्वांचा आलेख लेखकानं या पुस्तकात मांडला आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक बर्काव्यान्च्या पार्श्वभूमीवर तो मानवी व्यवहार व मनोव्यापार यांची सुरेल सांगड घालणारा आहे. आज टॉवरसंस्कृतीच्या विळख्यात जात चाललेल्या 'लालबाग'चा गेल्या आठ दशकांचा सामाजिक इतिहास साकारलेला हा ग्रंथ उल्लेखनीय दस्तऐवज ठरणार आहे.
-
Kshitijavaril Shalakaa (क्षितिजावरील शलाका)
स्त्रीला आजचे व्यक्तित्व प्राप्त झाले आणि ती 'अर्ध्या' आकाशा' वर हक्क सांगण्याइतपत समर्थ झाली, या पाठीमागे गेल्या हजार-दोन हजार वर्षांतील कर्तबगार महिलांचे कार्यकर्तुत्व आहे. त्यामध्ये क्लिओपात्रापासूनकमला सोहोनींपर्यंत अनेकींचा समावेश होतो. त्यांनी राजकारण-विज्ञानापसून दुःखितांच्या सेवेपर्यंत विविध क्षेत्रांत असाधारण कामगिरी केली आणी त्याआधारे मानवी समाजात काहीमुल्यांची प्रतिष्ठापना केली. शारदा साठे यांचे हे पुस्तक या विशाल ऐतिहासिक पटाचे चित्र उभे करते; आणि त्याबरोबर मानवी इतिहास व स्त्री-पुरुष संबंध याबद्दलचे वाचकाचे आत्मभान जागृत होत जाते.
-
Nyayalayin Vyavhaar Ani Marathi Bhasha
(यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने) भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर, न्यायालयीन व्यवहार प्रांतिक भाषेत (लोकभाषेत) झाल्यास सर्वसामान्यांना सुलभ झाले असते. परंतु, आजही महाराष्ट्रात मराठीच्या वापराबाबत हवी तशी प्रगती नाही. यावर वेळोवेळी चर्चा-परिसंवाद झाले. विविधांगी लिखाण झाले. शासनाने ठराव मांडले व यातील अडचणींचे निराकारण करण्याचा ऊहापोह झाला. महाराष्ट्रात ‘न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा’ यांचा समन्वय साधण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा हा सर्वांगीण आढावा.
-
Sambhav (संभव)
भा.ज.प. आणि त्यांचे साथीदार यांनी आपल्या ‘विेशासाचा प्रश्न’ म्हणून रामराज्य भूमीचा वाद वाढवत नेला, आणि एके दिवशी या कथेची सुरुवात सुचली. मी लिहीत गेलो. मी एखादा प्रसंग लिहावा आणि कालांतराने तसेच घडावे असे झाले. हे सर्व योगायोग की चमत्कार?’’
-
Dairy (डायरी)
प्रवीण बर्दापुरकरांनी गेल्या तीस वर्षात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय उलथापालथी पाहिल्या आहेत. हा काळच प्रचंड उलथापालथींचा आहे. त्यातील अनेक नायक-खलनायक वा प्रतिनायक-उपनायक प्रवीणना भेटले आहेत. काहीजण कुणीच नव्हते तेव्हा आणि पुढे स्वयंभू नायक- महानायक झाल्यावर. प्रवीण यांनी त्यांच्या त्या प्रवासाची मानसिक नोंद केली आहे आणि अर्वाचीन इतिहासात त्यांचे कोंदण कोणते ते ठरवून ती 'जागा' त्यांना दिली आहे. विशेष म्हणजे, प्रवीणच्या डायरीत आत्मप्रौढी नाही वा आत्मकरुणा नाही, आत्मवंचना नाही आणि कुठचा गंडही नाही. यामुळे या लेखनाला एकसहजता, एक तात्कालिक ऐतिहासिकता आणि एक प्रवाहीपणा प्राप्त झाला आहे. ही 'डायरी' प्रत्येक 'होतकरू' पत्रकारानेवाचावीच, मात्र तिचा परिसर पत्रकारितेच्या पलीकडे, म्हणजे आपल्या व्यापक सामाजिक राजकीयतेकडे आहे आणि म्हणूनच सर्वच प्रकारच्या वाचकांच्या मनोकक्षा रुंदावणारा आहे.
-
Negal: Hemalkashache Sangaati, Part 2
डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी श्री. विलास मनोहर १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झालं होतं. दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाशकाकांना आणून देत.
-
Negal (नेगल)
डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी श्री. विलास मनोहर १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झालं होतं. दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाशकाकांना आणून देत.
-
Aaydan
ती एक खेड्यात वाढलेली मुलगी होती. प्रथम तिला ती दलित असल्याची जाणीव झाली, त्यामुळे ती शहाणी होते, तर तिला ती स्त्री असल्याची जाणीव प्राप्त झाली...हा सारा भोग व त्यातून तावूनसुलाखून निघालेले परिपक्व, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व... तिचेच हे आत्मकथन.
-
Sonayachya Dhurache Thaske
सौदी अरेबियासारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या, कट्टर इस्लामी राज्यात उपेक्षा, अन्याय नि हालअपेष्टा सहन करत, आयुष्यातील उमेदाची पंचवीस वर्षे वास्तव्य करणार्या डॉ. उज्ज्वला दळवी यांनी त्या देशाच्या अंतरंगात शिरून, ते उकलून आपल्यापुढे ठेवले आहे. सहजसुंदर लिखाणामुळे वाचकप्रिय ठरले आहे.