Sthanabhrashta ( स्थानभ्रष्ट)

By (author) Dr.Shantilal Dhanik Publisher Granthali

मुलांवर अतिविश्वास ठेवणाऱ्या माझ्यासारख्या भोळ्या (बावळट) वृद्धांना त्यांच्या जीवनाची अंतिम वर्षे दुःखात भिजून जाऊ नयेत, यासाठी सावध राहण्याचा मी सल्ला देतो. 'जे न देखे रवी ते देखे कवी' त्याच्यापुढे जाऊन म्हणावेसे वाटते, की 'जे न देखे कवी ते देखे अनुभवी!' म्हणून मला आलेल्या अनुभवांना शब्ददेह देऊन मी जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवत आहे. हे कथन असले तरी ही कथा नाही. काही स्वजनांच्या बर्‍यावाईट कृत्यांची नोंद केल्याविना ते सादर होऊ शकत नाही, म्हणून त्यात तशा काही प्रतिक-प्रसंगाचे सविस्तर आलेखन आहे. ते केवळ वास्तवदर्शन घडवण्यासाठी आणि माझ्या सल्ल्यास वजन प्राप्त करून देण्याच्या हेतूने केले आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे स्मरून मी भविष्यातील वृद्धांचे जीवनमान बिघडू नये, या हेतूने ही 'ठेच'; नव्हे, अनेक ठेचा सादर केल्या आहेत. आपल्या मुलांवरील प्रेमापोटी कमी-अधिक चुका प्रत्येकाकडून घडतात, पण या चुकांचा अतिरेक मुर्खपणा ठरतो. आपल्या मुलाची पत्नी वा मुलीचा नवरा यांच्या, आपल्याच मुलांना वश करण्याच्या क्षमतेस कमी लेखू नये. शक्य तो पायाखालची सरावाची जमीन सोडू नये.

Book Details

ADD TO BAG