-
Harit Vasaicha Ladha (हरित वसईचा लढा)
वेगवेगळ्या राजवटी पाहिलेली वसई आणि परिसर हा मुंबईलगतचा निसर्गरम्य प्रदेश. त्याचं हे निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचं भान परकीयांनीही ठेवलं. त्याला 'हरित संरक्षित भाग' असा दर्जा दिला. तो प्रदेश तीस वर्षांपूर्वी धनदांडगे, बिल्डर आणि सरकारी धोरणांच्या वक्रदृष्टीत सापडला. पैसा आणि दहशतीच्या जोरावर इथली हिरवी शेतं बांधकामांच्या वाळवीनं गिळंकृत व्हायला लागली. भ्रष्टाचारामुळे प्रदेशाला अवकळा येऊ लागली. या निसर्गरम्य परीसराचं अस्तित्व टिकविण्यासाठी उभी राहिली हरित वनराई संरक्षण समिती' फादर फ्रान्सिस दिब्रिटोंसारख्या धर्मगुरूंपासून सर्व थरांतील लहान-थोरांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या लढ्याला विजय तेंडूलकर, माधव गडकरी, कुसुमाग्रज, मेधा पाटकर, ज्युलिओ रिबेरो, उल्हास जोशी अशा अनेक दिग्गजांचा पाठींबा मिळाला. या संघर्षातील एक अग्रणी मार्कुस डाबरे यांनी मांडलेली ही संघर्षकहाणी.
-
Nrutyasaudamini Damyanti Joshi(नृत्यसौदामिनी दमयंत
ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचे कलाजीवन कृतार्थ ठरले तरी व्यक्तिगत जीवन मात्र अशांत राहिले...
-
Survantache Phulpakharu (सुरवंटाचे फोल्पाखरू)
कायद्याची, न्याय करण्याची सारी प्रक्रिया मुळात वांझोटी आहे. त्यातून हक्क शाबीत होतात, जय- पराजय नक्की होतो, मी बरोबर की तो बरोबर हे जाहीर होते, पण काहीतरी उत्पादन, काहीतरी मूल्यवर्धन (व्हॅल्यू अॅडिशन) हा जो कुठल्याही कारखान्याचा किंवा कंपनीचा मूळ उद्देश तो मात्र साध्य होत नाही. काहीही घडवायचे असेल तर त्याला या प्रक्रियेचा उपयोग होत नाही. यात मुळात निर्मितीक्षमतेची बीजेच नाहीत. उत्पादकतेला वाढ, उत्पादनातली वाढ ही त्यांतून प्राप्त होत नाही, कारण मुळात हे समाजवादी कायदे ज्या वर्गकलहाच्या, आहेरे-नाहीरे या वर्गगटांच्या कल्पनांवर आधारलेले आहेत, तो आधार मुळात लुटीची वाटणी अशा प्रकारचा आहे. केकची वाटणी कशी करायची असा तो विचार आहे. खायचे हिस्से ठरवण्याचा भाग आहे. केक कसा तयार करायचा, त्याचा आकार कसा वाढवायचा याचा त्यात विचार नाही, केकचा आकार सामूहिक श्रमाने वाढत असतो किंवा निदान वाढायला हवा हे त्यात बसत नाही.
-
Prvartan (प्रवर्तन)
दारिद्र्याची/वेदनांची भीषण वर्तनं इथून पुढच्या काळातही येतील. तो सारा संताप समजून घेऊयाच. परंतु आता तेवढ्यावरच थांबता येणार नाही. आणि थांबता कामाही नये. सर्वहारा समाजाने जीवनसंघर्षात फोडलेले आर्त टाहो ऐकून एकीकडे हळहळायचे आणि दुसरीकडे ज्या व्यवस्थेने हे उध्वस्त-बेचिराख-भयाण जीवन त्यांच्या पदरात घातले, त्याच व्यवस्थेचे लाड-कौतुक आणि भरणपोषण करायचे, तीच धार्मिक-सांस्कृतिक व्यवस्था अबाधित कशी राहील याची बेमालूम काळजी घ्यायची, माजघरात त्याच संस्कृतीची निष्ठा राखायची, हा दुटप्पीपणा पुरे झाला. माणसाला अमानुष पातळीवर आणणाऱ्या संस्कृतीची उगमस्थानं आता खणून काढली पाहिजेत. आता मुळालाच हात घातला पाहिजे.
-
Swapnanchi Baag (स्वप्नांची बाग)
प्रसिद्धी माध्यमे कसाही अन् काहीही प्रचार करू देत, पण आजही सार्या जगाचे डोळे अमेरिकेवर असतात. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी तिथे गेलेले व अमेरिकन झालेले नागरिकही 'आता, पूर्वीची अमेरिका राहिली नाही' असं म्हणतात! पण बुद्धी, शिक्षण आणि मेहनत ह्यांची तयारी असणार्या प्रत्येकालाच वाटते की, स्वप्ने प्रत्यक्षात पाहायची असतील तर जावे अमेरिकेसच! ११ सप्टेंबरच्या स्फोटानंतरही आपल्याकडे अमेरिकन कॉन्सुलेटसमोर 'व्हिसा' मिळवण्यासाठी लांबच लांब रांग असतेच की! अशा स्वप्नांची बाग फुलवणाऱ्या देशात राहण्याचा योग आला. अमेरिकेची भव्य-दिव्यता, तेथील स्वच्छता-शिस्त-विपुलता यावर तर खूप वाचलं होतं. ह्या देशातला साधारण माणूस कसा असतो हे पाहण्यासाठी फेरफटका सुरु केला आणि विलीफ्रान्सिस दिसली. त्यामधून स्फुरलेल्या ह्या कथा...
-
Maitra Jeevache (मैत्र जीवाचे)
विदुर महाजन यांचा तरुण मुलगा, मैत्रेय मोटारसायकलच्या अपघातात आकस्मिक हे जग सोडून गेला. तो आघात पचवणंमहाजन कुटुंबास अशक्यप्राय झालं. त्यातून सावरण्यासाठी विदुर महाजन डायरी लिहू लागले. मग सुरू झाला एक शोध - जीवनमृत्यूचा, सुखदुःखांचा, मानवी अस्तित्वाचा व नात्यांचा आणि कलेचाही. तेच हे तत्त्वचिंतनपर ललितलेखन. म्हटलं तर विदुर महाजन यांचं व्यक्तिगत, पण प्रत्येक संवेदनाशील माणसाला अर्थपूर्ण जगण्यासाठी बळ देऊ केल असं.
-
Yene Bodhe Aamha | Aso Sarva Kal || (येणे बोधे आम्
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सोनोपंत दांडेकरांचे कार्य अविस्मरणीय आहे. तत्त्वज्ञानासारखा विषय अभ्यासून सोनोपंतांनी सामान्य माणसाच्या संस्कृती कारणाशी अखंड नाते जोडले, त्यामुळे वारकरी संप्रदायात वर्तानाचे नवे भान आले. या भानाला पौर्वात्य आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची बैठक देणार्या सोनोपंतांचे रसाळ चरित्र.
-
Humaan (हुमान)
संगीता धायगुडे यांचा एकूणच जीवनप्रवास एक 'हुमान'- कोडे आहे. नियतीने घातलेले. 'आंधळी' गावच्या एक डोळस मुलीचे हे आत्मकथन! केवळ शिक्षणाच्या बळावर, आपल्या परिपक्व प्रतिभेच्या सामर्थ्यावर त्या जीवनात आलेले असह्य धक्के पचवू शकल्या. हा त्यांचा मानसिक प्रवास केवळ थक्क करणारा आहे.'हुमान' ला मानवीपणाचा स्पर्श आहे. जे जसे घडले, ते घडताना मनावर जे संस्कार उमटले... जे ओरखडे उमटले .. ते तसेच सांगण्याचा प्रयत्न संगीता धायगुडे यांनी केलेला आहे. 'हुमान' एखाद्या लोलकाप्रमाणे आपल्यासमोर फिरत राहते. सुंदरता ही केवळ कल्पना असू शकेल.. पण आयुष्य हे केवळ अनाकलनीय कोडेच नाही, तर कल्पितापेक्षा सुंदर आहे.. याचे प्रत्यंतर 'हुमान' ने घडवलेले आहे. एकाच वेळी ते मनाला चटका लावणारे... मनाची पकड घेणारे... कोडे घालणारे... आणि कोड्याची उकल करणारे असे झाले आहे.