-
Drushtipalikadil Srushti (दृष्टीपलीकडील सृष्टी)
आफ्रिका - एक अगम्य आणि अदभूत खंड! तेथील शतकानुशतके हिंसाचाराने व अत्याचाराने गांजलेली नि गूढ चालीरीतींच्या दुष्ट चक्रात गुरफटलेली. आजही तेथील कित्येक रहिवाशांचा चेटूक, करणी,पिशाच्चबाधा मंत्र-तंत्र,जादूटोणा नि चमत्कार यांच्यावर विश्वास आहे व त्यामुळे ते कर्मकांड व बुवाबाजीच्या आहारी गेले आहेत, हे लेखकास सहा वर्षांपूर्वी आफ्रिकेत स्थलांतर केल्यानंतर प्रकर्षाने जाणवले. 'दृष्टीपालीकडील सृष्टी' मध्ये आहेत आफ्रिकेतील अमानुष विळख्याची व्याप्ती आणि निष्पत्ती सिद्ध करणाऱ्या बारा मनोरंजक सत्यकथा. त्यातील काही आहेत चकित नि अस्वस्थ करणाऱ्या तर काही भयावह नि अंगावर शहरे आणणाऱ्या. त्यांच्या माध्यमातून लेखकाने आफ्रिकी मानसिकतेचा शोध घेतला आहे व तो सध्या, सोप्या नि उत्कंठावर्धक शैलीत सदर केला आहे. अंधश्रद्धांनी निर्मिलेली मानसिक गुलामगिरी - मग ती जगाच्या कोणत्याही भागातील असो - कशी समाजविघातक असते हे या संग्रहातील बहुतेक सार्या कथांचे सूत्र आहे. सर्वसाधारण मराठी माणसाच्या दृष्टीपालीकडील हि अज्ञात आणि अनोखी सृष्टी पाहिल्यानंतर आपल्या सभोवतीच्या समाजातील आंधश्रद्धांचे निर्मुलन करणाऱ्या चळवळीच्या कार्याची महानता व त्याचे महत्व सुस्पष्ट व्हावे अशी लेखकाची अपेक्षा आहे.
-
Jhoke Ameriketale (झोके अमेरिकेतले)
अमेरिका, जगातली, समृद्ध, सशक्त महासत्ता. डॉलरमुळे 'अमेरिका सांगे जग डोले' अशी अवस्था असते. तेथील आर्थिक सुबत्ता अनेकांना या देशात स्थलांतर करण्यास आकर्षित करून लागली. पण अमेरिकेत खरंच सर्व काही छान आहे का ? हा प्रश्न मनात डोकावतोच. याचे उत्तरं सापडते ते डॉ. अनंत लाभसटेवार यांच्या 'झोके अमेरिकेतले'मध्ये कुवेत, इराक, अफगाणिस्तानमधील युद्धामुळे अमेरिकेवर आर्थिक भार पडलेला आहे. तेथे नागरिकांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना आता सरकारला डोईजड वाटू लागल्या आहेत. अशा योजनांमुळे मध्यमवर्गीय व उच्चभ्रूंवर वाढणारा कराचा बोजा व येथील गरिबांमध्ये काम करण्याची वृत्ती कमी होत आयते खाण्याची वृत्ती बळावत आहे, याचे वर्णन यात आहे. तसेच अमेरिकेत येणारी वादळे, २००८ च्या मंदीचा तडाखा, त्यामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, शिकागो, कॅलिफोर्निया, मॅनहटन या शहरांची सद्यस्थिती, तेथील समाजजीवन, अध्यक्षपदाची निवडणूक अशा विविध विषयांवरील अनुभवावर आधारित हे लेखन या महासत्तेचे सर्व बाजू उघड करते.
-
Gau Tyana Arti (गाऊ त्यांना आरती)
खुली-छुपी युद्धं, नैसर्गिक कोप किंवा कोणतीही आपत्ती त्यांच्या मनोबलावर मात करू शकत नाही. अशा दुर्दम्य इच्छाशक्तीचे आपले सैनिक, सैनिकी दलं, युद्धप्रसंग आणि घटना यांची माहिती देणारं हे पुस्तक...
-
Eka Yakshache Akshaygan (एक यक्षाचे अक्षयगान)
अविनाश टिळक यांची आई कर्करोगाशी झुंज देऊन १७ सप्टेंबर १९७४ रोजी कालवश झाली. त्यांचे वडील-दादा - त्यानंतर अकरा वर्षांनी, २१ जुलै १९८५ रोजी निधन पावले. दादांनी स्वतःचा मृत्यू होईपर्यंत आपल्या स्वर्गस्थ पत्नीशी रोजच्या रोज जो लिखित पत्रसंवाद साधला त्याचे मूर्तरूप म्हणजे हे पुस्तक. दादांनी दोनशे पाणी वह्यांचे एकूण चोवीस भाग लिहिले. त्यात चार हजार पृष्ठे भरतील एवढा मजकूर आहे. माहिती, हकीगत, मुक्तचिंतन, व्याकुळता, विरहभाव, पश्चात्तापदग्धता अशा विविध विचार-भावनांनी भरलेल्या या संवादपुस्तिका म्हणजे पत्नीवियोगाने भारावलेल्या पतीचा स्मृतीयज्ञच होय; त्यात यक्षाच्या विरहगानाची आर्तता आहे...
-
Dhyas Ani Pravas (ध्यास आणि प्रवास)
सुलभा वर्दे १९६२ साली मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर म्हणून रुजू झाल्या. विविध प्रकारच्या रुग्णांची काळजी वाहताना तिथल्या अतिविकलांग रुग्णांची दारुण अवस्था त्यांच्या मनाचा ठाव घेत होती. जगण्याची आस हरवलेल्या या रुग्णांमध्ये आत्मनिर्भरतेतून आत्मविश्वासाची ऊर्जा निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यातूनच सुरु झाला पॅराप्लेजिक फौंडेशनचा प्रवास.
-
Safiya Begum (साफिया बेगम)
एका ओळीत एक शब्द; त्या शब्दांतून आणि न लिहिलेल्या शब्दांतून काव्यसंग्रह फुलत जाते. चार आवर्तनांतून विलक्षण शब्दसाम्राज्य निर्माण करणारा अरुण शेवते यांचा हा अंतर्मुख करणारा काव्यसंग्रह.
-
Aabhal Majha (आभाळ माझं)
भाषावार प्रांतरचना झालीच; पण स्त्रीचं प्रांतवार जोखडही किती घट्ट होत गेलं याच्या अनुभवाच्या या कथा. यात आहेत मराठी-कानडी संयुक्त संस्कृती जगताना सहवासातून, भेटलेल्या मित्रमैत्रिणींतून, नात्यागोत्यातून निकट आलेल्यांची सुखदु:खं आणि अनुभवलेले प्रसंग...
-
Dhund Swachand (धुंद स्वच्छंद)
गिरीभ्रमण छ्न्दातील आनंद आणि त्याचे पैलू व कंगोरे टिपणारा अनोखा ललित लेखसंग्रह
-
Mazya Kaljachi Gosht -Nisargopcharachi Kimaya Ek S
ही कहाणी आहे आधुनिक काळातील, 'र्हुमॅटिक हार्ट डिसिज' या काही हजारांत एखाद्याला होणाऱ्या दुर्धर रोगावर चालू असलेले अॅलोपॅथी उपचार सोडून, फक्त निसर्गोपचार करून जीवदान मिळवणाऱ्या एका वीस वर्ष्यांच्या मुलीची! ह्या मुलीसाठी आईने जीवाची पर्व न करता केलेल्या परिश्रमांची आणि निसर्गोपचारमहर्षी डॉ. जयनारायण जायस्वाल यांच्या शंभर टक्के खात्रीशीर निसर्गोपचाराची! - डॉ. कुमुद बेदरकर (निसर्गोपचारतज्ञ)