Chinmadhala Dr. Jinduo

By (author) Kalpana Gosavi-Desai Publisher Rajhans Prakashan

१९४९ साली चीनमध्ये साम्यवादाची राज्यपद्धती आली. तेव्हापासून चिनी जनतेने फार सोसलंय. साम्यवादाच्या बगलेत पडलेला दहशतवाद भोगलाय. कॉम्रेड्सच्या त्या राज्यात ’जगत राहणे’ म्हणजेही कोणते दिव्य, याची खबर जगाला पोहोचू न देण्याची दक्षता तिथल्या राज्यकर्त्यांनी पुरेपूर घेतली होती. चीनला प्रत्यक्ष भेट देऊन बांबूच्या पडद्याआडचा दहशतवाद कादंबरीरूपात आणणारी ही साहित्यकृती. लेखिका म्हणते, ’आपल्याहाती असलेल्या लोकशाहीच्या ठेव्याची जाणीव व्हावी; लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका, न्यायालयात दाद मिळण्याची सोय, कुणावरही जाहीर टीका करण्याचा परवाना, अशा सोयीस्कर समजुतीत बेपर्वा वागणार्‍या आपले डोळे उघडावेत, म्हणून ही लिहिली.’ स्वातंत्र्य मिळताच ’लोकशाही’ ऐवजी ’साम्यवाद’ आपल्या कपाळी आला असता तर...?

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category